मुंबई - बॉलिवूड अॅक्शन स्टार टाइगर श्रॉफ आपली बॅक बॉडी दाखवताना दिसला आहे. सोशल मीडियावरील त्याचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. टाइगरने इन्स्टाग्रामवर एक मोनोक्रोम फोटो पोस्ट केला आहे, ज्यात तो कॅमेऱ्याकडे पाठ दाखवत उभा आहे.
टाइगरच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यासोबतच बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनीही त्याला कॉमेंट्स लिहून प्रोत्साहित केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अभिनेता अनिल कपूरने लिहलं, "शानदार .. प्रेरणादायक."
संगीतकार आणि गायक हिमेश रेशमियाने कॉमेंट करताना लिहिलंय, "सुपर।"
अलिकडे टाइगर फ्लाईंग किंक मारताना दिसला होता. ते पाहून चाहते दंग झाले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
टायगरने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करीत लिहिले होते, ''जखमी झाल्यानंतर पुन्हा एकदा फ्लाईंग किक मारल्याने बरे वाटले. तुम्हालाही ही अविश्वसनिय बाब विश्वसनिय वाटेल.''