मुंबई - अभिनेत्री करिना कपूर खानने सोमवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आपल्या दुसऱया नवजात मुलाचा पहिला फोटो चाहत्यांसाठी पोस्ट केला आहे. करिना आणि सैफ अली खानने २१ फेब्रुवारी रोजी आपल्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले होते. करिनाने आज एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो त्यांनी पोस्ट केला आहे आणि मुलगा झाल्याचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला होता.
''अशी कोणतीही गोष्ट नाही जे महिला करु शकत नाही. महिला दिनाच्या शुभेच्छा,'' असे तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये करिनाने म्हटले आहे.
मागील महिन्यात मुलाला डिस्चार्ज मिळाल्यावर करिना आणि सैफ खान यांनी आपल्या नवजात मुलाचा फोटो हौशी फोटोग्राफर्सना घेऊ दिला नव्हता. यापूर्वी या सेलेब्रिटी जोडप्याला तैमुर हा मुलगा २० डिसेंबर २०१६ रोजी झाला होता. तैमुर हा हौशी फोटोग्राफर्सचा नेहमीच कौतुकाचा विषय राहिला आहे.
वर्क फ्रंटवर अभिनेत्री करिना खान आगामी सुपरस्टार आमिर खानची भूमिका असलेल्या 'लालसिंग चड्डा'मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा - सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोणने मिळवला 'हा' सन्मान