ETV Bharat / sitara

'हाऊसफुल्ल ४'च्या पोस्टरवर झळकले अक्षय, रितेश आणि बॉबी, वाढली उत्कंठा - Akshay Kumar latest news

अक्षयच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांनी हाऊसफुल्ल ४ या सिनेमाच्या पोस्टरसाठीचा तगदा लावला होता. काहींनी मजेशीर मीम्स शेअर करत हे पोस्टर लवकर प्रदर्शित करावं, अशी मागणी अक्षयकडे केली होती. त्याचे आणि इतर कलाकारांचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

'हाऊसफुल्ल ४'
author img

By

Published : Sep 25, 2019, 1:53 PM IST

मुंबई - काही दिवसांपूर्वीच 'हाऊसफुल्ल ४' चित्रपटाची स्टार कास्ट काय असेल याचा उलगडा झाला होता. मात्र हे कलाकार नेमक्या कोणत्या भूमिका साकारणार आहेत याबद्दलची उत्सुकता वाढली होती. आता यावरचाही पडदा उघडला जातोय. अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांच्या व्यक्तीरेखा असलेले पोस्टर प्रसिध्द करण्यात आलंय.

या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सॅनॉन, पूजा हेगडे अशी एकापेक्षा एक तगडी स्टारकास्ट असलेला हाऊसफुल ४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशात आता इतर कलाकारांच्या व्यक्तीरेखा कोणत्या असतील याच्या प्रतीक्षा आहेत.

  • The wait is over... Akshay Kumar as Bala and Harry... Check out the first look posters of #HouseFull4... Trailer on 27 Sept 2019... Directed by Farhad Samji... Produced by Sajid Nadiadwala... Co-produced by Fox Star Studios. pic.twitter.com/DCJdo29SKS

    — taran adarsh (@taran_adarsh) September 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'हाऊसफुल्ल ४'मध्ये अक्षय कुमार बाला आणि हॅरी ही व्यक्तीरेखा साकारतोय. बाला, शैतान का साला असे एका पोस्टरवर लिहिण्यात आलंय. दुसऱ्या पोस्टरमध्ये हॅरीच्या चोहऱ्यावर फोटो फ्रेममधील बाला हात ठेवताना दिसतोय.

'हाऊसफुल्ल ४'च्या दुसऱ्या पोस्टरमध्ये रितेश देशमुख दिसत आहे. यातील पहिल्या पोस्टरमध्ये तो नर्तकी बांगडू महाराजच्या भूमिकेत दिसत असून दुसऱ्या पोस्टरमध्ये रॉच्या व्यक्तीरेखेत दिसणार आहे.

बॉबी देओल हा धर्मपुत्रा आणि मॅक्सच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचेही पोस्टर प्रसिध्द झाले आहे.

दरम्यान फरहाद सामजी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर साजिद नादियाडवाला यांची निर्मिती असणार आहे. १८० कोटींचं बजेट असणारा हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २७ सप्टेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.