भारतात असंख्य लोकनृत्ये लोकप्रिय आहेत. यापैकीच एक डान्स म्हणजे भांगडा. प्रत्येक पंजाबी फॅमिलीमध्ये या डान्सला अनन्य साधारण महत्त्व आहे. कोणताही आनंदाचा प्रसंग असो पंजाबी लोक याच भांगड्यावर वेडे होऊन नाचतात.
हिंदी सिनेमानेही भांगड्याला खूप लोकप्रियता मिळवून दिली आहे. हा डान्स आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न असलेला 'भांगडा पा ले या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला आहे. 'उरी - द सर्जिकल स्ट्राक' या यशस्वी चित्रपटानंतर रॉनी स्कूवाला यांच्या आरएसव्हीपी या निर्मिती संस्थेने 'भांगडा पा ले'ची निर्मिती केली आहे.
-
Trailer of #BhangraPaaLe... Stars Sunny Kaushal, Rukshar Dhillon and Shriya Pilgaonkar... Directed by Sneha Taurani... Produced by Ronnie Screwvala... 1 Nov 2019 release... #BhangraPaaLeTrailer: https://t.co/U5rf5kwNIl
— taran adarsh (@taran_adarsh) September 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Trailer of #BhangraPaaLe... Stars Sunny Kaushal, Rukshar Dhillon and Shriya Pilgaonkar... Directed by Sneha Taurani... Produced by Ronnie Screwvala... 1 Nov 2019 release... #BhangraPaaLeTrailer: https://t.co/U5rf5kwNIl
— taran adarsh (@taran_adarsh) September 30, 2019Trailer of #BhangraPaaLe... Stars Sunny Kaushal, Rukshar Dhillon and Shriya Pilgaonkar... Directed by Sneha Taurani... Produced by Ronnie Screwvala... 1 Nov 2019 release... #BhangraPaaLeTrailer: https://t.co/U5rf5kwNIl
— taran adarsh (@taran_adarsh) September 30, 2019
भांगडा हा डान्स आंतरराष्ट्रीय डान्स स्पर्थेत नेऊ पाहणाऱ्या दोन तरुण जोडप्याची ही रंजक कथा आहे. यात भरपूर इमोशन्स, युध्दाची पार्श्वभूमी आणि पंजाबी परिवार यांची संवेदनशील गोष्ट मांडण्याचा प्रयत्न ट्रेलरमध्ये दिसून येतो.
या चित्रपटात सनी कौशल, रुकसार धिल्लन आणि श्रीया पिळगांवकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. स्नेहा तुराणी यांनी याचे दिग्दर्शन केलंय. १ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.