ETV Bharat / sitara

आयुष्मान खुराना आणि रकुल प्रीत सिंग अभिनित 'डॉक्टर जी' ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित! - आयुष्मान खुराना

आगामी राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर अभिनित 'बधाई दो' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यानंतर, आता त्यांनी आयुष्मान खुराना व रकुल प्रीत सिंग आणि शेफाली शाह यांच्या भूमिका असलेला बहुप्रतिक्षित 'डॉक्टर जी' चित्रपटाच्या थिएट्रीकल प्रदर्शनाची १७ जून २०२२ अशी ठरविली आहे. रकुल आणि ज्येष्ठ अभिनेत्री शेफाली शाह यांच्यासोबत आयुष्मान पहिल्यांदाच स्त्रीरोगतज्ज्ञाची भूमिका साकारताना पाहणे मनोरंजक असणार आहे.

'डॉक्टर जी'
'डॉक्टर जी'
author img

By

Published : Nov 3, 2021, 7:54 PM IST

नुकतेच जंगली पिक्चर्स या निर्मितीसंस्थेने त्यांच्या आगामी राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर अभिनित 'बधाई दो' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यानंतर, आता त्यांनी आयुष्मान खुराना व रकुल प्रीत सिंग आणि शेफाली शाह यांच्या भूमिका असलेला बहुप्रतिक्षित 'डॉक्टर जी' चित्रपटाच्या थिएट्रीकल प्रदर्शनाची १७ जून २०२२ अशी ठरविली आहे. मेडिकल कॅम्पस कॉमेडी ड्रामामध्ये रकुल आणि ज्येष्ठ अभिनेत्री शेफाली शाह यांच्यासोबत आयुष्मान पहिल्यांदाच स्त्रीरोगतज्ज्ञाची भूमिका साकारताना पाहणे मनोरंजक असणार आहे.

आयुष्मान खुराना हा 'बरेली की बर्फी' आणि 'बधाई हो' या दोन यशस्वी चित्रपटांनंतर जंगली पिक्चर्सच्या 'डॉक्टर जी' मधून दिसणार आहे. आता आयुष्मान आणि जंगली पिक्चर्स हे दोघे बॉक्स ऑफिसवर हॅटट्रिक करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. जंगली पिक्चर्सच्या अमृता पांडे म्हणाल्या की, “चित्रपटाचे लेखक, सुमित, सौरभ आणि विशाल यांनी अनुभूतीसह ‘डॉक्टर जी’ ची एक अप्रतिम स्क्रिप्ट तयार केली असून अनुभूतीने ती पुढच्या स्तरावर नेली आहे. पुढच्या वर्षी १७ जूनला ती चित्रपटगृहात आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणारी अनुभूती कश्यप म्हणते की, “चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर, आम्ही आता चित्रपटगृहांमध्ये येण्यासाठी सज्ज झालो आहोत. आयुष्मान, रकुल, शेफाली, जंगली पिक्चर्स आणि माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या ‘डॉक्टर जी’ च्या संपूर्ण टीमसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे आणि त्याची परिणीती पडद्यावर दिसून येईल. हा एक समृद्ध करणारा अनुभव होता. हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करेल आणि तो त्यांच्यासमोर आणण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

अनुभूती कश्यप दिग्दर्शित, आयुष्मान खुराना, रकुल प्रीत सिंग आणि शेफाली शाह अभिनित, ‘डॉक्टर जी’ १७ जून २०२२ रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - 'मन्नत'बंगल्याबाहेर फॅनची शाहरुख स्टाईलमध्ये एन्ट्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.