ETV Bharat / sitara

तारा सुतारिया, आदर जैन यांचे लग्न ही एक अफवा - तारा आणि आदर जैन डेटिंग

अभिनेत्री तारा सुतारिया आणि आदर्श जैन ही जोडी विवाह बंधनात अडकणार असल्याची बातमी म्हणजे केवळ अफवा असल्याचे सांगण्यात आलंय. दोघांना अनेकवेळा एकत्र पाहिल्यानंतर ते डेट करीत असल्याची चर्चा सिनेजगतात ऐकायला मिळत होती. मात्र आदर जैनच्यावतीने ही बातमी निराधार असल्याचे स्पष्ट करण्यात आलंय.

Tara Sutaria
तारा सुतारिया
author img

By

Published : Oct 17, 2020, 8:08 PM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार जोडी तारा सुतारिया आणि आदर्श जैन यांच्या लग्नाची बातमी गेल्या काही काळापासून मीडियात आली होती. परंतु त्यांच्या वतीने या अफवा असल्याचे सांगण्यात आलंय. आदर जैनच्यावतीने त्याचा प्रवक्ता म्हणाला, या गोष्टी खोट्या आणि निराधार आहेत. सध्या तो आपल्या आगामी एक्सेल एंटरटेनमेंटच्या ''हॅलो चार्ली'' चित्रपटाच्या कामात गुंतला आहे."

तारा आणि आदर जैन काही काळ एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहे. बर्‍याच वेळा त्यांना एकत्र पाहण्यात आलंय. तारा देखील आदरचा भाऊ अरमान जैनच्या लग्नात दिसली होती.

आदर सध्या 'हॅलो चार्ली' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये आहे, तर तारा 'तडप' आणि 'एक व्हिलन 2' चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. मिलाप लूथरिया दिग्दर्शित 'तडप' हा तेलुगु हिट चित्रपट 'आरएक्स 100' चा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात ती सुनिल शेट्टीचा मुलगा अहान याच्यासोबत दिसणार आहे. अहान या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मोहित सूरीच्या ‘एक व्हिलन 2’ चित्रपटामध्ये तारा हिच्यासोबत जॉन अब्राहम, दिशा पाटनी आणि आदित्य रॉय कपूर सारख्या कलाकारांनीही काम केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.