मुंबई - अजय देवगणचा सध्या चर्चेत असलेला चित्रपट 'तान्हाजीः द अनसंग वॉरियर' आता करमुक्त करण्याचा निर्णय उत्तरप्रदेश सरकारने घेतला आहे. याबद्दल अभिनेत्री काजोलने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ट्विटरवरून आभार मानले आहेत.
-
Thank you for declaring #TanhajiTheUnsungWarrior tax-free in Uttar Pradesh 🙏🏻@myogiadityanath @UPGovt #TanhajiUnitesIndia pic.twitter.com/ENe2YGcuxj
— Kajol (@itsKajolD) January 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Thank you for declaring #TanhajiTheUnsungWarrior tax-free in Uttar Pradesh 🙏🏻@myogiadityanath @UPGovt #TanhajiUnitesIndia pic.twitter.com/ENe2YGcuxj
— Kajol (@itsKajolD) January 14, 2020Thank you for declaring #TanhajiTheUnsungWarrior tax-free in Uttar Pradesh 🙏🏻@myogiadityanath @UPGovt #TanhajiUnitesIndia pic.twitter.com/ENe2YGcuxj
— Kajol (@itsKajolD) January 14, 2020
गेल्या आठवड्यात 'छपाक' आणि 'तान्हाजीः द अनसंग वॉरियर' हे दोन चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले होते. 'छपाक' हा अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांच्या संघर्षावर आधारित आहे. हा एक सामाजिक विषय असलेला चित्रपट आहे. मात्र, दीपिका पदुकोणने जेएनयू विद्यार्थ्यांना भेट घेऊन पाठिंबा दर्शवल्यानंतर 'छपाक'वर बहिष्कार टाकण्याची भूमिका उजव्या राजकीय संघटनांनी घेतली होती.
अशातच काँग्रसची सरकारने असलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये 'छपाक' करमुक्त करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक विषय असलेल्या 'तान्हाजीः द अनसंग वॉरियर' चित्रपटाला टॅक्स फ्री करण्याचा निर्णय भाजपची सत्ता असलेल्या उत्तरप्रदेश सरकारने घेतला आहे. अजय देवगणची पत्नी काजोल हिने याबद्दल उत्तरप्रदेश सरकारचे आभार मानले आहेत.