ETV Bharat / sitara

रियाने शेअर केलेल्या व्हॉट्सअ‌ॅप चॅटला सुशांतच्या बहिणीने दिले उत्तर - प्रियंकाचे कौतुक करताना

रिया चक्रवर्ती हिने सुशांतसोबत झालेल्या चर्चेचे संदेश सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सुशांतची बहिण श्वेतासिंह हिने आपल्या कुटुंबाचा बचाव केला आहे. सुशांतचा एक जुना व्हिडिओ तिने शेअर केला असून यात तो आपली बहिण प्रियंकाचे कौतुक करताना दिसतो.

Shweta, Sushant, Riya
श्वेता, सुशांत, रिया
author img

By

Published : Aug 10, 2020, 2:42 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने व्हॉट्सअ‌ॅप मेसेजेसची मालिकाच चालवत सुशांत हा बहिण प्रियंकावर कसा वैतागला होता हे सिध्द करण्याचा प्रयत्न केला. त्याला सुशांतची अमेरिकेत राहणारी बहिण श्वेता सिंग किर्ती हिने सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. यात सुशांत आपल्या बहिणीबद्द चांगले बोलत असल्याचा एक जुना व्हिडिओ श्वेताने शेअर केला आहे.

एका आघाडीचा पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सुशांत म्हणाला होता, ''मा सगळ्यांच्या जवळचा आहे. परंतु माझी बहिण सर्वात जवळची आहे कारण मला ती भेटते. आमची विचार करण्याची पध्दत एकसारखी आहे.''

सुशांतचा हा व्हिडिओ शेअर करताना श्वेताने लिहिले की, " त्यानं कबुल केलं की तो प्रियंका (सोनू दी) च्या खूप जवळचा होता आणि ती त्याला भेटायची.''

रियाच्या लिगल टीमने शेअर केलेल्या चॅटमध्ये सुशांत म्हणतो की, त्याची बहिण सिद भाईसोबत हेराफेरी करीत आहे.(सिद भाई म्हणजे तिचा नवरा सिध्दार्थ की सिध्दार्थ पिठाणी हे स्पष्ट नाही.)

सुशांतने आपल्या मेसेजमध्ये पुढे असेही लिहिले आहे की त्याची बहीण त्यांच्या आईच्या शिकवणीविरुध्द गेली होती. त्याने लिहिले, "तुझ्या अहंकारामुळे तू आंधळी झाली आहेस, तुला देव आशिर्वाद देवो कारण मी घाबरत नाही आणि जगात बदल घडवण्यासाठी आतापर्यंत जे करीत आलोय ते यापुढेही करीत राहीन. देव आणि निसर्गच ठरवेल काय योग्य आहे.''

हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्ती चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल

या मेसेजेसमध्ये सुशांतने रिया, तिचा भाऊ शौविक आणि तिच्या कुटुंबाचीही स्तुती केली आहे. ''तुझे कुटुंबिय महान आहेत. शौविक हा दयाळू आहे आणि तुम्हीही माझे आहात, तुम्ही अपरिहार्य परिवर्तनासाठी योग्य कारण आहात आणि वैश्विक पातळीवर मला समाधान देता. माझ्या सभोवताली तुमच्यासारखे प्रोत्साहन देणारे रॉकस्टार आहेत.'', असे सुशांतने लिहिले होते.

आणखी एका मेसेजमध्ये सुशांत म्हणतो, तुम्ही हसत रहा, मला जमीलासारखे स्वप्न पडेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही छान वाटत आहात. मी आता झोपायचा प्रयत्न करतोय. ते आश्चर्यकारक आहे का? बाय."

दरम्यान, रिया, तिचा भाऊ शोविक सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) मनी लाँडरिंगच्या चौकशीसंदर्भात चौकशीसाठी णार आहेत. त्यांचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. रिया आणि शोविकची यापूर्वीच चौकशी झाली आहे, ईडी कार्यालयात त्यांची ही दुसरी भेट असेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.