ETV Bharat / sitara

के.के सिंह यांच्याकडून रिया चक्रवर्तीविरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल - सुशांतसिंह राजपूत

सुशांतसिंह राजपूतचे वडील के.के सिंह यांनी रिया चक्रवर्तीच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल करून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. एफआयआरचा तपास आधीच सीबीआयकडे वर्ग करण्यात आला असल्याने, मुंबईतील चौकशीचे हस्तांतरण करण्याची मागणी करणारी रियाची याचिका फेटळण्याची विनंती के. के. सिंह यांनी न्यायालयाला केली

सुशांतसिंह राजपूत
सुशांतसिंह राजपूत
author img

By

Published : Aug 8, 2020, 2:51 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूतचे वडील के.के. सिंह यांनी रिया चक्रवर्तीच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल करून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी पाटण्यात न होता मुंबईत व्हावी, अशी मागणी करणारी याचिका रियाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. 'एफआयआरचा तपास आधीच सीबीआयकडे वर्ग करण्यात आला असल्याने, मुंबईतील चौकशीचे हस्तांतरण करण्याची मागणी करणारी रियाची याचिका फेटळण्याची विनंती के. के. सिंह यांनी न्यायालयाला केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 ऑगस्ट रोजी होणार आहे.

रियाचे गुन्हेगारी कृत्य सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत, असे सुशांत राजपूतच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. सर्वोच्च न्यायालय आता रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर 11 ऑगस्टला सुनावणी करणार आहे.

बिहारमधील नोंदणीकृत एफआयआर मुंबईत हस्तांतरित करण्याची मागणी रियाने केली होती. सुशांतचे वडील केके सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यांनी मुंबई पोलिसांवर कारवाई आणि सहकार्य न केल्याचा आरोप केला आहे. सुशांतच्या निधनानंतरही मुंबई पोलिसांनी दोषींना शोधण्यात कोणतीही तत्परता दर्शविली नाही. त्यामुळे सीबीआयनेच या प्रकरणाची चौकशी करावी, असे सिंह म्हणाले.

खुद्द रियाने सीबीआय चौकशीची मागणी केली होती. रियाची याचिका आता खंडित झाली आहे. खटल्याची चौकशी एका राज्यातून दुसर्‍या राज्यात हस्तांतरित केली जाऊ शकते. मात्र, तपास नाही, असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.