मुंबई - गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित 'सुपर ३०' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. कोणताही आधार नसलेली मुलेदेखील देशातील बुद्धिमान व्यक्तिमत्त्वांपैकी एक होऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी झटणाऱ्या आनंद यांचा जीवनप्रवास या चित्रपटात दाखवला गेला आहे.
या चित्रपटाचे दोन दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत. चित्रपटाने दोन दिवसताच बॉक्स ऑफिसवर ३० कोटींची कमाई केली आहे. नुकतंच समोर आलेल्या अहवालानुसार या सिनेमाला सर्वाधिक प्रतिसाद मुंबईतून मिळाला असून या सिनेमाने मुंबईत पहिल्या दिवशी ३.७१ तर दुसऱ्या दिवशी ५.७९ कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे आनंद कुमारांच्या स्वतःच्या राज्यातच या चित्रपटाला सर्वात कमी प्रतिसाद मिळाला आहे. बिहारमध्ये या सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ ०.३८ तर दुसऱ्या दिवशी ०.४९ कोटींची कमाई केली आहे.
-
#Super30 goes from strength to strength in key circuits/territories... Fri and Sat biz in some circuits...
— taran adarsh (@taran_adarsh) July 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Mumbai: 3.71 cr, 5.79 cr
DelhiUP: 2.40 cr, 3.85 cr
Punjab: 1.02 cr, 1.70 cr
Rajasthan: 0.53 cr, 0.79 cr
CP: 0.52 cr, 0.74 cr
Mysore: 0.74 cr, 1.30 cr
Bihar: 0.38 cr, 0.49 cr
">#Super30 goes from strength to strength in key circuits/territories... Fri and Sat biz in some circuits...
— taran adarsh (@taran_adarsh) July 14, 2019
Mumbai: 3.71 cr, 5.79 cr
DelhiUP: 2.40 cr, 3.85 cr
Punjab: 1.02 cr, 1.70 cr
Rajasthan: 0.53 cr, 0.79 cr
CP: 0.52 cr, 0.74 cr
Mysore: 0.74 cr, 1.30 cr
Bihar: 0.38 cr, 0.49 cr#Super30 goes from strength to strength in key circuits/territories... Fri and Sat biz in some circuits...
— taran adarsh (@taran_adarsh) July 14, 2019
Mumbai: 3.71 cr, 5.79 cr
DelhiUP: 2.40 cr, 3.85 cr
Punjab: 1.02 cr, 1.70 cr
Rajasthan: 0.53 cr, 0.79 cr
CP: 0.52 cr, 0.74 cr
Mysore: 0.74 cr, 1.30 cr
Bihar: 0.38 cr, 0.49 cr
मुंबईपाठोपाठ, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, म्हैसूर आणि त्यानंतर बिहार राज्याचा क्रमांक आहे. दरम्यान या चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहलनं केलं असून संजीव दत्त यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. चित्रपटात हृतिकशिवाय मृणाल ठाकूर, विरेंद्र सक्सेना, पंकज त्रिपाठी आणि आदित्य श्रीवास्तव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.