मुंबई - अक्षय कुमारने आपल्या आगामी 'सुर्यवंशी' चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. २४ मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे.
नेहमी शुक्रवारी चित्रपट रिलीज होत असतो. मात्र 'सुर्यवंशी' मंगळवारी संध्याकाळी रिली केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने मल्टीप्लेक्सेस, रेस्टोरेंट्स आणि मॉल्स २४ तास चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर 'सुर्यवंशी'च्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतलाय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अॅक्श ड्रामा असलेल्या या चित्रपटात तीन सुपरकॉप्सना एकत्र आणले आहे. यामध्ये सिंघम ( अजय देवगण ), सिम्बा ( रणवीर सिंग ) आणि 'सुर्यवंशी' ( अक्षय कुमार ) हे तिघे एकत्र धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
अक्षयने एक व्हिडिओ शेअर करीत ही माहिती दिली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सुर्यवंशी' चित्रपटाचा ट्रेलर २ मार्चला रिलीज होणार आहे.