ETV Bharat / sitara

सोनू सोदूने चाहत्याला सांगितली, शाहरुख स्टाईलने बर्थडे साजरा करण्याची युक्ती - Shah Rukh latest news

शाहरुखच्या वाढदिवसाचे सेलेब्रिशन जसे बुर्ज खलिफावर झाले, त्या प्रकारे आपला वाढदिवस साजरा करण्याची विनंती एक सोशल मीडिया युझरने सोनू सूदला केले होते. त्याला सोनूने दिलेले प्रत्युत्तर खूपच खास आहे.

Sonu Sodhu
सोनू सूद
author img

By

Published : Nov 4, 2020, 4:56 PM IST

मुंबई - कोरोना महामारीच्या काळात लोकांना मदत करणारा अभिनेता सोनू सूद मेहमी त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत असतो. एका युझरने सुपरस्टार शाहरुख खानचा एक फोटो शेअर केला आहे. शाहरुखच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवर रोषणाई करण्यात आली होती. यात शाहरुखचे काही फोटो, त्याच्या काही लोकप्रिय चित्रपटांमधील दृश्ये देखील होती.

शाहरुखचा हा फोटो पोस्ट करत त्या व्यक्तीने अभिनेता सोनू सूदला विनंती केली की, "सोनू सर, ५ नोव्हेंबरला माझा वाढदिवस आहे. कृपया बुर्ज खलिफावर सेलिब्रिशन करा प्लिज."

यावर सोनूने उत्तर दिले, "आपला वाढदिवस तीन दिवस उशिरा आला आहे. असो थोडी मेहनत करा आणि नाव कमवा, आयुष्यात मग बघा बुर्ज खलिफाच काय हे जग आकाशावर नाव लिहिल."

शाहरुखने सोमवारी आपला वाढदिवस दुबईमध्ये कुटुंबीयांसह साजरा केला. इंडियन प्रीमियर लीगच्या पार्श्वभूमीवर तो सध्या संघात कोलकाता नाइट रायडर्सचे (केकेआर) समर्थन करण्यासाठी यूएईमध्ये आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.