मुंबईच्या पावसाने सामान्य माणूस हवालदिल झालाय तर मग भटक्या कुत्र्यांची तर कुत्तरओढ सुरू आहे. सर्वत्र पाणी असल्यामुळे एक भटका कुत्रा बिल्डिंगच्या आडोशाला आला. तिथल्या वॉचमनने त्याला अमानुष मारहाण केली. या घटनेनंतर हा कुत्रा मरणावस्थेमध्ये आढळून आला. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय.
हा व्हिडिओ पाहून प्राणी संरक्षणासाठी काम करणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. हा व्हिडिओ वरळीच्या एका बल्डिंगमधील असल्याचे समजते. मारहाण करणाऱ्यावर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी आता बॉलिवूड सेलेब्रिटीही करीत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर पोस्ट लिहित मागणी केलीय की, ‘अशी वागणूक ही अमानुषतेचा कळस आहे. यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकाने एकत्र येण्याची गरज आहे. अशा मुक्या जनावरांना न्याय देण्याची आवश्यकता आहे’
अभिनेत्री सोनम कपूरने सोशल मीडियावर लिहिलंय, ‘ज्या व्यक्तीने या मुक्या जनावराला अशी वागणूक दिली, त्याच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे’
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने म्हटलंय, ‘हा गुन्हा आहे, याप्रकरणी अन्याय करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे’