मुंबई - अभिनेता सोनू सूदने सामाजिक कार्य आमच्या रक्तातच असल्याची प्रतिक्रिया वृत्तसंस्थेला दिली आहे. पंजाबमध्ये सुरू असलेल्या निवडणूकीत त्याची बहीण मालविका सूद मोगामधून काँग्रेसच्या उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर तो बोलत होता.
एएनआय या वृत्त संस्थेशी बोलताना त्याने याबद्दलची प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल एएनआयने दोन ट्विट शेअर केली असून पहिल्या ट्विटमध्ये सोनू म्हणतो, "माझ्या आईने, एक प्राध्यापक या नात्याने आयुष्यभर मुलांना शिकवले. माझे वडील सामाजिक कार्यकर्ते होते. येथील शाळा, महाविद्यालये आणि धर्मशाळा आमच्या जमिनीवर बांधल्या आहेत. तर ते आमच्या रक्तातच आहे : सोनू सूद" त्याची बहीण मालविका सूद मोगामधून काँग्रेसच्या उमेदवार आहेत.
दुसऱ्या ट्विटमध्ये तो म्हणतो, ''माझ्या बहिणीने अधिक जबाबदारी घेतली, आमच्या शहरात जास्तीत जास्त लसीकरण तिच्याद्वारे केले गेले. शिक्षण आणि लोकांना मदत करण्याचा प्रश्न आहे, तिने मोगामध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले होते. लोकांनी तिला व्यवस्थेचा एक भाग होण्यासाठी पुढे ढकलले आहे: सोनू सूद''
सोनू सूदच्या नावचा देशभर बोलबाला आहे. अशा परिस्थितीत अभिनेता राजकारणात येऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात होती. सोनूने हे टाळले, परंतु सोनू सूदची बहीण मालविका अलीकडेच काँग्रेसमध्ये सामील झाली आहे आणि पंजाबमध्ये निवडणूक लढवत आहे. दरम्यान, सोनू सूद पंजाब निवडणुकीत बहिणीसाठी प्रचार करणार नसल्याची बातमी समोर काही दिवसापूर्वी आली होती.
त्यावेळी सोनू सूद म्हणाला होता, 'मला खूप अभिमान आहे की तिने हे पाऊल उचलले आहे. ती अनेक वर्षांपासून पंजाबमध्ये राहते आहे आणि तेथील लोकांच्या समस्या तिला समजतात. मला आनंद आहे की ती लोकांच्या थेट संपर्कात असेल आणि त्यांना मदत करण्यास सक्षम असेल.
सोनू सूद पुढे म्हणाला होता, ''हा तिचा राजकीय प्रवास आहे आणि माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही. मी जे करत आहे ते करत राहीन. मी त्याच्यासाठी प्रचार करणार नाही कारण तिने स्वत: कठोर परिश्रम करावे आणि त्यात सहभागी व्हावे अशी माझी इच्छा आहे. जिथपर्यत माझा संबंध आहे, मी राजकारणापासून लांब राहणार आहे.''
हेही वाचा - वामिकाचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर न करण्याचे अनुष्का शर्माचे आवाहन