मुंबई - सावरिया या पदार्पणीय चित्रपटापासून ते एक लडकी को देखा तो ऐसा लगा चित्रपटापर्यंतचा सोनमचा फिल्मी प्रवास रंजक आहे. फिल्मी करिअरमधील या १२ वर्षांत सोनमनं वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. अशात सोनमच्या बहुचर्चित रांझना चित्रपटाला आज सहा वर्ष पूर्ण झाले आहेत.
याच निमित्ताने तिनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने रांझना चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबतच सोनमनं याला कॅप्शनही दिलं आहे. रांझना हा चित्रपट नेहमीच माझ्या हृदयाच्या खूप जवळ असेल, असं तिनं म्हटलं आहे.
-
Raanjhanaa has always been very close to my heart. It explored ideals and conflicts that I still think about even 6 years after the release. Thank you to the entire team for being so real and fearless@arrahman @aanandlrai @dhanushkraja @ReallySwara @AbhayDeol #6YearsOfRaanjhanaa pic.twitter.com/Dy3oOMBcno
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) June 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Raanjhanaa has always been very close to my heart. It explored ideals and conflicts that I still think about even 6 years after the release. Thank you to the entire team for being so real and fearless@arrahman @aanandlrai @dhanushkraja @ReallySwara @AbhayDeol #6YearsOfRaanjhanaa pic.twitter.com/Dy3oOMBcno
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) June 21, 2019Raanjhanaa has always been very close to my heart. It explored ideals and conflicts that I still think about even 6 years after the release. Thank you to the entire team for being so real and fearless@arrahman @aanandlrai @dhanushkraja @ReallySwara @AbhayDeol #6YearsOfRaanjhanaa pic.twitter.com/Dy3oOMBcno
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) June 21, 2019
या चित्रपटाने असे काही प्रश्न उपस्थित केले होते, ज्यांचा आज सहा वर्षांनंतरही मी विचार करते, असे म्हणत चित्रपटाच्या संपूर्ण टीमचेही सोनमने आभार मानले आहेत. याशिवाय चित्रपटातील रांझना हुआ मैं तेरा, या गाण्याची झलकही तिने शेअर केली आहे. २०१३ मध्ये आलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केलं होतं. चित्रपटात धनुष आणि सोनमशिवाय स्वरा भास्कर आणि अभय देओल यांच्याही महत्तवाच्या भूमिका होत्या.