मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जनजीवन भयभीत झाले आहे. लॉकडाऊनची स्थिती असल्यामुळे कमाई थांबली आहे. अशावेळी लोकांना मदत करण्याची जबाबदारी बरी कमाई करणाऱ्या सर्वांची आहे. आपल्या रोजच्या कमाईतील काहीभाग दान करावा असे आवाहन गायक मिका सिंगने केले आहे.
सध्या मिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यात मिका सायकलवरून गरजूंची मदत करत आहे. तर यावेळी मिकाने चक्क गरजूनां पैसे वाटले आहेत. या व्हिडिओत मिका गरजू व्यक्तींना हाक मारून बोलावत आहे व त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
व्हिडीओत काहीजण मिकाला आशीर्वाद देत आहेत. त्यानंतर पुढे तो एका अपंग व्यक्तिशी बोलतो, थांबून मिका त्यांची विचारपूस करतो. मिका त्याला विचारतो, “तुम्ही इथेच राहता? किती जण आहेत तुमच्या कुटुंबात?” तेव्हा तो व्यक्ती ५ असं म्हणतो. तेव्हा मिका त्याला आपण मदत करू असं म्हणत उद्या किराणा सामान आणून देईन , अस आश्वासनही त्या व्यक्तिला देतो.
हेही वाचा - 'मनी हाईस्ट'मधील 'बेल्ला सिओ'च्या कडक मराठी व्हर्जनची चर्चा!