ETV Bharat / sitara

शुभ मंगल सावधानला दोन वर्ष पूर्ण, भूमीने शेअर केली भावनिक पोस्ट - दम लगा के हैशा

हा चित्रपट खूप खास आहे, कारण याच्या सेटवर चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे एकमेकांसोबत एक खास नाते जुळले. आयुष्मानसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना ती म्हणाली, आयुष्मानसोबत काम करताना खूप सारी मस्ती सुरु असते.

भूमीने शेअर केली भावनिक पोस्ट
author img

By

Published : Sep 1, 2019, 4:41 PM IST

मुंबई - आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या शुभ मंगल सावधान या सिनेमाला आज दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. याच निमित्ताने अभिनेत्री भूमी पेडणेकरनं भावनिक पोस्ट शेअर करत या सिनेमाच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. याशिवाय आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिनं चित्रपटातील काही फोटोही शेअर केले आहेत.

या पोस्टमध्ये भूमीनं लिहिलं, या चित्रपटाबद्दल पहिल्यांदा जेव्हा ऐकलं, तेव्हा मला हा सिनेमा विनोदी आणि सुंदर वाटला, मात्र, जेव्हा मी संपूर्ण कथा ऐकली, तेव्हा मी हळू हळू टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि ही कथा अतिशय खास असल्याचे माझ्या लक्षात आले.

हेही वाचा - 'झुंड'चा शेवटचा शॉट चित्रीत करण्यासाठी 'बिग बी' रवाना

हा चित्रपट खूप खास आहे, कारण याच्या सेटवर चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे एकमेकांसोबत एक खास नाते जुळले. यासोबत आयुष्मानसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना ती म्हणाली, आयुष्मानसोबत काम करताना खूप सारी मस्ती सुरु असते.

आयुष्यामनसोबत पुन्हा एकदा काम करणं म्हणजेच तिच मस्ती पुन्हा एकदा आम्ही करणार, जी आम्हा दोघांना हवी आहे. आम्ही एकमेकांसोबत कमफर्टेबल आहोत आणि एकमेकांना एखाद्या गोष्टीत प्रगती करण्यासाठीही मदत करतो, असंही ती म्हणाली. दरम्यान आयुष्यमान आणि भूमीची जोडी दम लगा के हैशा, शुभ मंगल सावधान या सिनेमांनंतर आता बाला चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा - 'एक पाऊल स्वच्छतेकडे', बॉलिवूड सेलिब्रिटींची स्वच्छता मोहिम...!

Intro:Body:

Nat

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.