मुंबई - मेट्रो प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील 2238 झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी मिळाली आहे. झाडे तोडण्याच्या विषयावर नेमलेल्या समितीने 8 विरुद्ध 6 मतांनी प्रस्ताव मंजूर करून मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला. यानंतर मुंबईतील नागरिकांनी या गोष्टीला विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - अक्षयला भेटण्यासाठी ९०० किलोमीटर पायी आला चाहता, खिलाडीनं शेअर केला व्हिडिओ
नागरिकांशिवाय अनेक कलाकारही याविरोधात आवाज उठवताना दिसत आहेत. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं नुकतंच एक व्हिडिओ शेअर करत या गोष्टीला विरोध केला होता. आता या झाडांच्या रक्षाणासाठी श्रद्धा कपूरही पुढे सरसावली आहे. नुकतंच श्रद्धाने याठिकाणी जाऊन निदर्शनं केली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
निदर्शनांशिवाय तिनं नारेही दिले आहेत. ही झाडे आमची, नाही कोणाच्या बापाची, असं ती या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे. याशिवाय सोशल मीडियावर श्रद्धानं पोस्टही शेअर केली आहे. यात ती म्हणाली, माझ्यापरीनं ही झाडं वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक लोक एकत्र येत या झाडांच्या कत्तलीला विरोध करत आहेत. मेट्रो प्रकल्पासाठी २७०० हून अधिक झाडं तोडणं हे धक्कादायक आणि अमान्य आहे. आधीच पर्यावरणाविषयक समस्यांना आपण सामोरे जात आहोत, हे पुरेसं नाही का? मुंबईत अगोदरच पुरेसं प्रदुषण नाही का? अशात या शहराच्या फुफ्फुसांचाच नाश करण्याची परवानगी आता देण्यात आली आहे. हे थांबायला हवं, असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा - मलायकासाठी अर्जुन बनला फोटोग्राफर, संजय कपूरनं केली अशी कमेंट