अक्षय कुमार एक असा नट आहे जो सिनेमांच्या चित्रीकरणांमध्ये वेळ फुका घालवत नाही. गेल्यावर्षी लॉकडाऊन मध्ये चित्रीकरणांना परवानगी मिळाल्यानंतर त्याने लंडनमध्ये जाऊन ‘बेलबॉटम’ पूर्ण केला. तो चित्रपट कोरोना कालखंडातील लॉकडाऊन मध्ये चित्रित होणारा जगभरातील पहिला चित्रपट होता. अक्षय एका चित्रपटाचे चित्रीकरण संपवून लगेचच दुसऱ्या चित्रपटाच्या कमला लागतो. गेल्या दिडएक वर्षात कोरोना कालखंडात त्याने जवळपास अर्धा डझन चित्रपट पूर्ण केलेत आणि आता अक्षयने अजून एका चित्रपटाचे शूटिंग संपविले आहे.
-
AKSHAY WRAPS UP 'RAKSHA BANDHAN' SHOOT... #AkshayKumar and director #AanandLRai have wrapped up the shoot of #RakshaBandhan in #NewDelhi... Costars #BhumiPednekar... 11 Aug 2022 release. #IndependenceDay weekend pic.twitter.com/PF5YiAj86T
— taran adarsh (@taran_adarsh) October 12, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">AKSHAY WRAPS UP 'RAKSHA BANDHAN' SHOOT... #AkshayKumar and director #AanandLRai have wrapped up the shoot of #RakshaBandhan in #NewDelhi... Costars #BhumiPednekar... 11 Aug 2022 release. #IndependenceDay weekend pic.twitter.com/PF5YiAj86T
— taran adarsh (@taran_adarsh) October 12, 2021AKSHAY WRAPS UP 'RAKSHA BANDHAN' SHOOT... #AkshayKumar and director #AanandLRai have wrapped up the shoot of #RakshaBandhan in #NewDelhi... Costars #BhumiPednekar... 11 Aug 2022 release. #IndependenceDay weekend pic.twitter.com/PF5YiAj86T
— taran adarsh (@taran_adarsh) October 12, 2021
अक्षय कुमार आणि निर्माता-दिग्दर्शक आनंद एल राय यांनी त्यांच्या आगामी रक्षाबंधन चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीत पूर्ण केले आहे. या वर्षी जूनमध्ये मुंबई परिसरात एका मोठ्या सेटवर चित्रपटाच्या शूटिंग ला सुरवात करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी अक्षय याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान चांदणी चौकातील रस्त्यांवर धावताना दिसला होता, त्याचा हा फोटो बराच व्हायरल झाला होता. नुकत्याच मिळालेल्या माहितीवरून असे कळून आले आहे की दिल्लीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.
अक्षय कुमार सोबत भूमी पेडणेकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सहेजमिन कौर, दिपिका खन्ना, सादिया खतीब आणि स्मृती श्रीकांत या अक्षयच्या बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहेत. अलका हिरानंदानी आणि आनंद एल राय यांच्या सहकार्याने ह्या चित्रपटाचे सादरीकरण आणि वितरण झी स्टुडिओज द्वारा करण्यात येणार आहे. हिमांशु शर्मा आणि कनिका ढिल्लन लिखित, आनंद एल राय द्वारा दिग्दर्शित, रक्षाबंधन ही फिल्म केप ऑफ गुड फिल्म्स असोसिएशन सह कलर यलो प्रॉडक्शनची फिल्म आहे.
अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात चित्रपटगृहात रिलीज होण्यास तयार आहे.
हेही वाचा -गुलाबो सिताबो फेम फर्रुख जाफर यांच निधन; 89 वर्षी घेतला अखेरचा श्वास