ETV Bharat / sitara

पती राजच्या अटकेनंतर पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने पोस्ट केला ग्लॅमरस फोटो - पतीच्या प्रकरणाबद्दल शिल्पाचे अद्यापही मौन

जवळपास एक महिना लो प्रोफाइल राहिल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर परतली आहे. पती राज कुंद्राला अश्‍लील व्हिडिओ बनवण्याच्या प्रकरणात अटक झाल्यापासून माध्यमापासून दूरच राहात होती. पती राजच्या अटकेनंतर पहिल्यांदाच तिने आपला एक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पहिल्यांदाच पोस्ट केला आहे.

शिल्पा शेट्टीने पोस्ट केला ग्लॅमरस फोटो
शिल्पा शेट्टीने पोस्ट केला ग्लॅमरस फोटो
author img

By

Published : Aug 21, 2021, 8:02 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राला अश्‍लील व्हिडिओ बनवण्याच्या प्रकरणात अटक झाल्यापासून माध्यमापासून दूरच राहात होती. एका महिन्याहून अधिक काळानंतर अलिकडेच शिल्पा डान्स रिअॅलिटी शो सुपर डान्सर 4 च्या परिक्षक पॅनेलमध्ये परतली होती. पती राजच्या अटकेनंतर पहिल्यांदाच तिने आपला एक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पहिल्यांदाच पोस्ट केला आहे.

असे असले तरी पतीच्या प्रकरणाबद्दल शिल्पाने अद्यापही मौन बाळगले आहे आणि सोशल मीडियापासून दूर आहे. सुपर डान्सर 4 च्या आगामी एपिसोडसाठी तिने शुटिंग केल्यानंतर अभिनेत्री शिल्पाने पहिल्यांदाच फोटो पोस्ट करुन सर्वांनाच चकित केले आहे.

शनिवारी, शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन दोन फोटोंचा सेट शेअर केलाय. या फोटोत तिने स्प्रिंग समर कलेक्शनमधील कॉटूरियर मयूर गिरोत्राची साडी नेसली आहे.

डान्स रियालिटी शो सुपर डान्सर मध्ये ती अनुराग बसू आणि गीता कपूर सोबत परीक्षकांची भूमिका पार पाडत होती. आता ती पुन्हा शोवर परतली आहे. स्पर्धक आणि परिक्षक सहकाऱ्यांनी तिचे यथोचित स्वागतही केले होते. शिल्पाच्या आयुष्यात पूर्वीचे दिवस परततील अशी अपेक्षा तिच्या चाहते बाळगून आहेत.

हेही वाचा - गायक व संगीतकार अभिजीत कोसंबीला ‘पिरमाची गोडी लागलीया’!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.