ETV Bharat / sitara

राज कुंद्रापासून विभक्त होण्याच्या तयारीत शिल्पा शेट्टी? - राज कुंद्रापासून विभक्त होण्याच्या तयारीत शिल्पा शेट्टी?

शिल्पा शेट्टी कुंद्रा यापूर्वी म्हणाली आहे की तिचा पती राज कुंद्रा निर्दोष आहे आणि अश्लील सामग्री तयार करण्यात त्याचा सहभाग नव्हता. आता मात्र तिची भूमिका बदललेली दिसते. शिल्पा राज कुंद्रापासून दूर आयुष्य जगण्याची योजना आखत आहे.

शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी
author img

By

Published : Aug 30, 2021, 7:37 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेली काही महिने अतिशय वाईट स्थितचीतून पुढे जात आहे. तिचा पती राज कुंद्रा याला पॉर्नेग्राफिक आशय निर्माण केल्याच्या गुन्ह्याखाली अटक झाली आहे. ही अटक अशावेळी झाली जेव्हा शिल्पा शेट्टी 14 वर्षानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली होती. 'हंगामा 2' सिनेमा रिलीज होण्याच्या अगोदरच राज कुंद्राला अटक झाल्यामुळे या पुनरागमनाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला नाही.

मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा शिल्पा शेट्टीला प्रश्न विचारले तेव्हा तिने पतीच्या या व्यवसायाशी आपला काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. ती म्हणाली होती की तिला हॉटशॉट अॅपची नेमकी सामग्री माहिती नाही. तिने असेही सांगितले होते की तिचा पती निर्दोष आहे आणि अश्लील सामग्री तयार करण्यात गुंतलेला नाही.

आता मात्र शिल्पा सेट्टीने तिची भूमिका बदललेली दिसते. 46 वर्षीय अभिनेत्री शिल्पा कथितपणे राज कुंद्रापासून दूर आयुष्य जगण्याची योजना आखताना दिसत आहे. मिळालेल्या अहवालानुसार शिल्पा राज कुंद्राच्या मालमत्तेमधील एक पैशालाही स्पर्श करणार नाही. तिला आपला मुलगा वियान राज कुंद्रा आणि मुलगी शमिशा कुंद्रा यांच्याभोवती सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज वाटते.

शिल्पाला पती राज कुंद्रा असा काही वागेल याची कल्पना नव्हती. सध्या ती बॉलिवूडमध्ये परतली आहे. डान्स शोचे ती परिक्षक म्हणूनही काम करीत आहे. 'हंगामा 2' नंतर तिच्यासाठी बॉलिवूडचा दरवाजा पुन्हा उघडला आहे. तिचा 'निकम्मा' हा चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्यामुळे ती पुन्हा स्वतंत्र नवे आयुष्य सुरू करू शकते.

दरम्यान, शिल्पाने नुकताच सोशल मीडियावर चुका केल्याबद्दलचा संकेत देणारा मेसेज सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात तिने म्हटलंय, की ''चुका या संपूर्ण आयुष्यासाठीच्या देण्याचा भाग आहेत." यासोबत तिने एक स्टीकर टाकले असून यावर तिने लिहिलंय, "चुक झाली परंतु ठीक आहे."

पोर्नोग्राफी रॅकेटशी संबंध असल्याच्या आरोप असलेल्या उद्योजक राज कुंद्रा याला अद्याप दिलासा मिळालेला नाही. तो न्यायालयीन कोठडीमध्ये दिवस कंठत आहे.

हेही वाचा - प्रियंका निकचे 'बोल्ड फोटो' पाहून चाहत्यांनी उंचावल्या भुवया, तर 'लाजली' परिणीती!!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.