मुंबई - शाहरुख खानने बऱ्याच काळापासून त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केलेली नाही. त्याच्या नव्या सिनेमासाठी चाहते उतावीळ झाले आहेत. चाहत्यांचा मान राखत त्याने ५४ व्या वाढदिवसाला नवा चित्रपट करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
शाहरुख बऱ्याच काळापासून सिनेमापासून लांब आहे. 'झिरो' हा चित्रपट अपेक्षित कमाई करु न शकल्यामुळे तो खूप सावध पाऊले टाकत आहे.
अद्यापही शाहरुख खानने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केलेली नाही. यामुळे फॅन्स नाराज झाले आहेत. त्यांचा संताप आता वाढताना दिसत आहे.
इतकेच नाही, तर शाहरुख नव्या सिनेमाची घोषणा करीत नाही हे लक्षात येताच काही फॅन्सनी आत्महत्येची धमकी त्याला दिली आहे. एका चाहत्याने त्याला ट्विटरवर लिहिलंय, ''खान साहेब फार झाले. मी 'झिरो'नंतर एकही सिनेमा पाहिलेला नाही.''
फॅन्सने पुढे लिहिलंय, ''कारण त्यात आता उत्साह राहिलेला नाही. आता एकादी चांगली बातमी द्यावीच लागेल. जर १ जानेवारीला सिनेमाची घोषणा केली नाही. तर मी आत्महत्या करेन. पुन्हा एकदा सांगतो आत्महत्या करेन.''
फॅन्सच्या या ट्विटरला अद्यापही शाहरुखने उत्तर दिलेले नाही. २०२० च्या सुरूवातीला शाहरुख आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा करणार का याची प्रतीक्षा करावी लागेल.