ETV Bharat / sitara

..म्हणून शाहिद कपूर दिवसभरात ओढायचा तब्बल २० सिगारेट - cigarate

टीझरमध्ये कबीर सिंगची भूमिका साकारणाऱ्या शाहिदच्या हातात वारंवार सिगारेट पाहायला मिळत होती. शाहिद चित्रपटात एका अशा सर्जनची भूमिका साकारणार आहे जो सतत दारूच्या नशेत बुडालेला असतो

शाहिद कपूर दिवसभरात ओढायचा २० सिगारेट
author img

By

Published : Apr 12, 2019, 10:04 AM IST

मुंबई - अभिनेता शाहिद कपूर लवकरच 'कबीर सिंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. परंतु, प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी शाहिदला मात्र प्रचंड मेहनत करावी लागली.

टीझरमध्ये कबीर सिंगची भूमिका साकारणाऱ्या शाहिदच्या हातात वारंवार सिगारेट पाहायला मिळत होती. शाहिद चित्रपटात एका अशा सर्जनची भूमिका साकारणार आहे जो सतत दारूच्या नशेत बुडालेला असतो. या भूमिकेबद्दल बोलताना शाहिद म्हणतो, मी कधीही धुम्रपान करत नाही. मात्र, या भूमिकेसाठी कधी कधी चित्रपटाच्या सेटवर एकाच दिवसात २० हून अधिक सिगारेट ओढायचो.

चित्रीकरण पूर्ण होताच घरी जाण्यासाठी सिगारेटचा वास जावा म्हणून दोन तास अंघोळ करत असल्याचेही त्याने म्हटले. आता शाहिदची ही मेहनत फळाला येते का हे प्रदर्शनानंतरच समजेल. दरम्यान कबीर सिंग हा दाक्षिणात्य 'अर्जून रेड्डी' चित्रपटाचा रिमेक असणार आहे. चित्रपटात कियारा अडवाणी शाहिदच्या अपोझिट झळकणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.