ETV Bharat / sitara

सलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'किक २' रिलीजची तारीख जाहीर

सलमान खानच्या 'किक २' चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट २०२१ च्या ख्रिसमसला प्रेक्षकंच्या भेटीस आणला जाणार आहे.

author img

By

Published : Jan 16, 2020, 12:40 PM IST

Salman Khan
सलमान खान

मुंबई - सलमान खानच्या आगामी 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. यंदाच्या ईदला हा सिनेमा रिलीज होणार आहे. दरम्यान २०१४ ला आलेल्या 'किक' चित्रपटाच्या सीक्वलचीही जोरदार प्रतीक्षा सलमानचे फॅन्स करत आहेत. आता या चित्रपटाच्या रिलीजची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

सलमान 'किक २'च्या शूटींगला पुढील वर्षी सुरूवात करणार आहे. याची निर्मिती साजिद नाडियादवाला करत आहेत. 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाची निर्मितीही ते करत आहेत. हा चित्रपट २०२१ च्या ईदला रिलीज होईल तर 'किक' २०२१ च्या ख्रिसमसला रिलीज होईल.

काही दिवसापूर्वी साजिद नाडियादवाला यांनी 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटाची घोषणा केली होती. दोघेही ६ वर्षानंतर एकत्र काम करत आहेत.

'किक २' बद्दल बोलताना साजिद यांनी सांगितले, ''सलमान आणि मला दोघांनाही किकचा सीक्वल आणायचा आहे. आम्ही याची स्क्रिप्ट लिहिली असून यात डेव्हिलच्या भूमिकेत सलमान असेल. स्क्रिप्टचा पहिला ड्राफ्ट तयार झाला असून यावर्षीच्या अखेरपर्यंत पटकथा तयार होईल. डिसेंबर २०२१ ला सिनेमा रिलीज होईल.''

सलमान सध्या 'राधे' सिनेमाचे शूटींग करत आहे. हा चित्रपट यंदाच्या ईदला रिलीज होईल. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'शी होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.