ETV Bharat / sitara

'प्यार करोना', कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सलमान खानचे नवे गाणे प्रदर्शित - salman khan in lockdown

'इमोशनली पास रहो, फिजिकली दूर रहो', असे कॅप्शन देऊन सलमान खानने या गाण्याचा ऑडिओ शेअर केला आहे.

SALMAN KHAN NEW SONG PYAR KARONA RELEASE
'प्यार करोना', कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सलमान खानचे नवे गाणे प्रदर्शित
author img

By

Published : Apr 20, 2020, 3:07 PM IST

मुंबई - सध्या देशभरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनदरम्यान कलाविश्वातील कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधत असतात. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान देखील वेगवेगळे व्हिडिओ, फोटो शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात असतो. लॉकडाऊनदरम्यान तो त्याचा वेळ कसा घालवतो, याबाबतही तो पोस्ट करत असतो. आता त्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधारित एक गाणे तयार केले आहे. या गाण्याचा ऑडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'इमोशनली पास रहो, फिजिकली दूर रहो', असे कॅप्शन देऊन त्याने या गाण्याचा ऑडिओ शेअर केला आहे.

'प्यार करोना, खयाल करोना, मदत करोना, सबर करोना, फिकर करोना, ऐतबार करोना', अशा या गाण्यातील ओळी आहेत. तसेच, या गाण्यातून कोरोनापासून बचाव करण्याचे उपाय देखील सूचवले आहेत.

साजिद - वाजिद यांच्या जोडीने हे गाणे कंपोज केले आहे. तर, सलमान खान आणि हुसैन दलाल यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.