मुंबई - अभिनेता सैफ अली खान आगामी वेब सिरीज 'तांडव'मध्ये आपल्या शाही असण्याचा आनंद लुटताना दिसणार आहे. याशिवाय राजकीय नाट्य असलेल्या त्याच्या भूमिकेबरोबरच त्याच्या चाहत्यांसाठी या मालिकेत आणखी एक आकर्षण आहे, कारण हरियाणामधील त्याच्या वडिलोपार्जित पतौडी पॅलेसमध्ये सैफचे अनेक सीन शूट झाले आहेत.
अली अब्बास जफरच्या 'तांडव' या वेब सिरीजमध्ये छोटे नवाब एक मुरलेला राजकारणी समर प्रताप सिंह ही व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. पतौडी पॅलेसमध्ये मालिकेच्या चित्रीकरणाबद्दल बोलताना सैफ अली खानने एका वेबलोइडला सांगितले की त्याने निर्मात्यांना त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेत शूट करण्याची परवानगी देऊन एक अपवाद केला आहे.
"मला वाटते की हा राजवाडा आपल्याला रॉयल लुक देईल. तिथे उभे असलेले कोणीही रॉयल दिसायला लागेल. कधीकधी तो शूटसाठी देण्यास हरकत नाही, कारण वर्षातील ३४० दिवस हा पॅलेस वापरात नसतो, "असे सैफ म्हणाला.
शुटिंग क्रू जर पॅलेसच्या बाहेर शुटिंग करणार असेल तर हरकत नव्हती पण तांडव ही मालिका याला अपवाद ठरली, असे सैफ म्हणाला.
''आज काल फिल्म क्रू जबाबदारीने आणि लोकेशन्सची काळजी घेत शुटिंग करतात, असे असले तरी मला अस्वस्थ वाटत होते. नेहमी जेव्हा पॅलेसच्या बाहेर शुटिंग असेल तर मला काहीच अडचण असत नाही. पण तांडवच्या शुटिंगला पॅलेसमध्ये परवानगी देऊन मी अपवाद केला.'', असे सैफ अली खानने सांगितले.
हेही वाचा -धक्क्यापेक्षा पुनरागमन अधिक मजबूत : अँजिओप्लास्टीनंतर रेमोने सुरू केला व्यायाम
दिल्लीच्या पार्श्वभूमीवर सेट केलेली ही मालिका एक काल्पनिक नाट्य आहे. या मालिकेतून डिंपल कपाडिया आणि कृतिका काम्रा डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करीत आहेत.
हेही वाचा -चित्रपटामध्ये आपली धाव मर्यादित असल्याची जाणीव आहे - तापसी पन्नू