ETV Bharat / sitara

कोरोना महामारीत मदतीचा हात पुढे केल्याबद्दल रोहित शेट्टी यांचा सत्कार!

author img

By

Published : Jan 31, 2021, 6:33 PM IST

कोरोना महामारी काळात मदतीचा हात पुढे केल्याबद्दल दिग्दर्शक रोहित शेट्टीचा माध्यमांतर्फे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. शेट्टी यांनी लॉकडाऊन काळात पोलिसांना हॉटेलांत राहण्याची व्यवस्था, वैद्यकीय खर्च व इतर बाबी पुरविल्या. जेणेकरून, त्यांचा ताण हलका होईल व पुन्हा ताजेतवाने होऊन त्यांना लोकांची सेवा करण्यासाठी हुरूप येईल. याव्यतिरिक्त त्यांनी लॉकडाऊनच्या कठीण काळात फ्रंटलाईन वर्कर्स, विविध फिल्म युनियन आणि फ्रीलान्स फोटोग्राफर्स यांनाही मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली.

दिग्दर्शक रोहित शेट्टी न्यूज
दिग्दर्शक रोहित शेट्टी न्यूज

मुंबई - रोहित शेट्टीच्या शिरपेचात अजून एक तुरा खोवला गेलाय. कोरोना महामारीत मदतीचा हात पुढे केल्याबद्दल रोहित शेट्टीचा माध्यमांतर्फे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. गेले वर्ष कोरोना महामारीत गेले. लॉकडाऊन असल्यामुळे लोक घरीच बसून होते. परंतु, अत्यावश्यक सेवा पुरवणारे मात्र जीवाची बाजी लावून अखंडित सेवा पुरवीत होते. त्यातच काही नामांकित मंडळी या लोकांचे मनोधैर्य वाढविण्यात हातभार लावीत होती. काही अन्न वाटतं होती, काही औषधं तर, काही आर्थिक मदत पुरविण्यासाठी पुढे सरसावत होते.

दिग्दर्शक रोहित शेट्टी न्यूज
कोरोना महामारीत मदतीचा हात पुढे केल्याबद्दल रोहित शेट्टी यांचा सत्कार!

हेही वाचा - ‘वॉटर बेबी’ अनन्या पांडे डुंबतेय ‘मालदीव’ च्या समुद्रात!

बॉलिवूडचा नं.१ एंटरटेनिंग दिग्दर्शक, जो आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचं उदंड मनोरंजन करण्यात धन्यता मानतो, त्या रोहित शेट्टी यांनीदेखील कोरोना काळात भरपूर मदत केली, खासकरून कायदा आणि सुव्यवस्था पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची. अनेक वर्ष चित्रपटांतून हिरोला ‘लार्जर दॅन लाईफ’ दाखविण्याच्या अट्टाहासापायी पोलिसांना दुय्यम दर्शवण्यात येत आले. परंतु, रोहित शेट्टी यांनी आपल्या चित्रपटांमधून पोलीस व पोलीसदल यांना पॉझिटिव्ह स्वरूपात दाखविले व त्यांची माणुसकी अधोरेखित केली. पोलीसदलाबद्दल आदर असणाऱ्या रोहीत शेट्टी यांनी लॉकडाऊन काळात पोलिसांना ८ हॉटेलांत राहण्याची व्यवस्था, त्यांचा वैद्यकीय खर्च व इतर बाबी पुरविल्या. जेणेकरून, त्यांचा ताण हलका होईल व पुन्हा ताजेतवाने होऊन त्यांना लोकांची सेवा करण्यासाठी हुरूप येईल. त्यांना यासाठी ‘सकाळ सन्मान’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

याव्यतिरिक्त रोहित शेट्टी यांनी लॉकडाऊनच्या कठीण काळात फ्रंटलाईन वर्कर्स, विविध फिल्म युनियन आणि फ्रीलान्स फोटोग्राफर्स यांनाही मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली. रोहित शेट्टी यांचा, पोलीस दलावर आधारित, अक्षय कुमार, अजय देवगण व रणवीर सिंग अभिनित, ‘सूर्यवंशी’ प्रदर्शनासाठी तयार असून यावर्षी होळीच्या आसपास प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.रोहित शेट्टी सध्या रणवीर सिंग व पूजा हेगडेसोबत ‘सर्कस’ च्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

हेही वाचा - नोरा फतेहीचा 2020 वर्षातला शेवटचा जबरदस्त डान्स व्हिडिओ पाहिलात का?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.