मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्ती सीबीआय चौकशीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असून तिचा विश्वास आहे की, या प्रकरणाची चौकशी कोणत्याही एजन्सीने केली तरी सत्य तेच राहील.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर बुधवारी अॅडव्होकेट सतीश मानशिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे की, "माननीय सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सत्यता आणि परिस्थिती आणि मुंबई पोलिसांच्या चौकशी अहवालाचा शोध घेतल्यानंतर रियाने स्वतः सीबीआय चौकशीची मागणी केल्यामुळे या प्रकरणात सीबीआय चौकशी करणे योग्य होईल असे वाटते. त्याचवेळी, माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील असे म्हटले आहे, की दोन्ही राज्यांनी एकमेकांविरूद्ध राजकीय हस्तक्षेप केल्याच्या आरोपामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपविणे न्यायाच्या हिताचे असेल."
मानेशिंदे पुढे म्हणाले, "घटनेच्या कलम १४२ अन्वये कोर्टाने आपले अधिकार वापरून चौकशी सीबीआयकडे वर्ग केली असल्याने, रियाला सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागेल, जसे ती मुंबई पोलीस आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीला सामोरे गेली होती. कोणतीही एजन्सी या प्रकरणाची चौकशी करत असली तरी सत्य एकसारखेच राहील असे रियाला वाटते.''
सुशांत सिंह राजपूत हा 14 जून रोजी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळला होता.