ETV Bharat / sitara

अजय अतुलचे 'झुंड'मधील पहिले दणदणीत गाणे रिलीज - अमिताभ बच्चन झुंड गाणे

नागराज मंजुळे यांच्या हिंदी पदार्पणाच्या 'झुंड' चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक करीत आहेत. ४ मार्च रोजी या चित्रपटाचे प्रदर्शन देशभर होणार आहे. याचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटातील पहिले 'आया ये झुंड है' गाणे रिलीज करण्यात आले आहे.

झुंड गाणे रिलीज
झुंड गाणे रिलीज
author img

By

Published : Feb 14, 2022, 12:12 PM IST

Updated : Feb 14, 2022, 12:33 PM IST

मुंबई - बहुप्रतीक्षित 'झुंड' चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. अजय अतुलचे संगीत असलेले हे जबरदस्त गाणे प्रेक्षकांना मोहून टाकणारे असेच आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या सोशल मीडियावर हे गाणे रिलीज केले आहे.

नागराज मंजुळे यांच्या हिंदी पदार्पणाच्या 'झुंड' चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक करीत आहेत. ४ मार्च रोजी या चित्रपटाचे प्रदर्शन देशभर होणार आहे. याचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटातील पहिले 'आया ये झुंड है' गाणे रिलीज करण्यात आले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

३ मिनीटे आणि २६ सेकंद असलेले 'आया ये झुंड है' हे गाणे अजय गोगावले यांनी गायले असून अजय अतुल या संगीतकार जोडीनेच लिहिले आहे. यामध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या तरुण मुलांची टोळी हातात रॉड, काठ्या, स्टीक, बॅट हातात घालून चालताना दिसते. या टोळीमध्ये 'फँड्री' चित्रपटातील जब्या म्हणजेच अभिनेता सोमनाथ अवघडे आघाडीवर दिसत आहे. गाण्याच्या मध्ये या टोळीतील एकेक व्यक्तीरेखा कशा आहेत याची झलक पाहायला मिळते. गाण्याच्या अखेरीस या झुंडचे नेतृत्व अमिताभ करताना दिसतात. या गाण्यात चित्रपटातील काही प्रसंगही दिसतात. एका सीनमध्ये 'सैराट'चा परश्या म्हणजेच आकाश ठोसर एका तरुणाच्या कानाखाली मारताना व पाठलाग करताना दिसतो.

हे गाणे एक प्रकारे झुंडचे प्रमोशनल गाणे म्हणता येईल. चित्रपटाचे कथानक काय आहे याची झलक यातून स्पष्ट दिसत आहे.

हेही वाचा - Pondicherry : संपूर्णतः स्मार्ट फोनवर शूट झालेला पहिला मराठी चित्रपट, ‘पाँडीचेरी'!

Last Updated : Feb 14, 2022, 12:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.