मुंबई - अभिनेता जॉन अब्राहमची भूमिका असलेला 'सत्यमेव जयते' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाचा दुसरा भाग तयार करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा हा चित्रपट गेल्या वर्षी २ ऑक्टोबरला रिलीज होणार होता. मात्र कोरोनामुळे याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते.
-
IT'S OFFICIAL... #SatyamevaJayate2 postponed... #SMJ2 OFFICIAL STATEMENT... pic.twitter.com/bRHeANIsz0
— taran adarsh (@taran_adarsh) April 27, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">IT'S OFFICIAL... #SatyamevaJayate2 postponed... #SMJ2 OFFICIAL STATEMENT... pic.twitter.com/bRHeANIsz0
— taran adarsh (@taran_adarsh) April 27, 2021IT'S OFFICIAL... #SatyamevaJayate2 postponed... #SMJ2 OFFICIAL STATEMENT... pic.twitter.com/bRHeANIsz0
— taran adarsh (@taran_adarsh) April 27, 2021
सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 'सत्यमेव जयते २' या चित्रपटाचे रिलीज आणखी पुढे ढकलल्याचे निवेदन निर्मात्यांच्या वतीने प्रसिध्द करण्यात आलंय.
मिलाप झवेरी दिग्दर्शित या चित्रपटात जॉन अब्राहमसह मनोज वाजपेयी आणि दिव्या खोसला कुमारदेखील मुख्य भूमिकेत आहेत. २०१८च्या अॅक्शन ड्रामा 'सत्यमेव जयते' चा हा सिक्वेल आहे. भूषण कुमार या चित्रपटाचे निर्माता आहेत.
एका माध्यमाच्या मुलाखतीत जॉनने रिलीजबाबत सांगितले, की 'हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा फार वेगळ्या रुपात प्रदर्शित केला जाणार आहे. पहिला चित्रपट हा खूप मोठा प्रेक्षकवर्ग असणाऱ्यांसाठी होता. मात्र, यावेळी काही महत्वांच्या मुद्यांवर प्रकाश टाकत विशेष व्यक्तींपर्यंत हा चित्रपट पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे'
तिहेरी भूमिकेबाबत तो म्हणाला, की 'या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलाप झवेरी अद्याप काही पात्रांवर काम करत आहेत. मी इतरही भूमिकेमध्ये दिसू शकतो. मात्र, यावर कोणताही शिक्कामोर्तब झाला नाही. ज्यावेळी असे काही असेल, त्यावेळी त्याची घोषणा केली जाईल.
'सत्यमेव जयते' हा चित्रपट सध्या तरी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.
हेही वाचा - सत्यमेव जयते'मध्ये जॉन अब्राहम साकारणार तिहेरी भूमिका?