ETV Bharat / sitara

मेगा-बजेट पॅन इंडिया चित्रपट 'RRR'चे रिलीज पुढे ढकलले

एसएस राजामौली यांनी त्यांच्या मेगा-बजेट आगामी पॅन इंडिया चित्रपट 'RRR' ची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना व्हायरस विषाणूची तिसरी लाट देशात सुरू असून दिल्लीमध्ये थिएटर्स बंद करण्यात आले आहेत. याबाबत मोठी जोखीम न घेण्यातचा निर्णय आरआरआरच्या निर्मात्यांनी घेतला आहे. वेळापत्रकानुसार 'RRR' चित्रपट 7 जानेवारी रोजी रिलीज होणार होता.

'RRR'चे रिलीज पुढे ढकलले
'RRR'चे रिलीज पुढे ढकलले
author img

By

Published : Jan 1, 2022, 5:38 PM IST

हैदराबाद - जगभरात वेगाने पसरत असलेल्या प्राणघातक कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एसएस राजामौली दिग्दर्शित मेगा-बजेट आगामी 'RRR' या पॅन इंडिया चित्रपटाचे रिलीज पुढे ढकलण्यात आले आहे. कोरोना विषाणूमुळे पुन्हा एकदा देशातील सिनेमागृहे बंद होण्याची शक्यता आहे. यामुळे निर्मात्यांनी जोखीम न घेता चित्रपटचे रिलीज पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

अगोदरच्या वेळापत्रकानुसार 'RRR' चित्रपट 7 जानेवारी रोजी रिलीज होणार होता. या चित्रपटाचे प्रमोसनही जोरदारपणे सुरू होते. स्वतः एसएस राजामौली , आलिया भट्ट, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या टीव्ही शोमधून चित्रपटाचा प्रचार करीत होते. यापूर्वी हा चित्रपट यावर्षी 13 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. राजामौली आता चित्रपटाचे रिलीज पुढे ढकलण्याच्या मनस्थितीत नव्हते.

राजधानी दिल्लीतील वाढत्या केसेस पाहता सिनेमागृहांना टाळे लावण्यात आले आहे. तर महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये केवळ 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जात आहे.रणवीर सिंगच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या '83' चित्रपटावर कोरोना विषाणूचा मोठा परिणाम झाला आहे. बॉक्स ऑफिसवर याचा विपरीत परिणाम झाला आहे.

आरआरआर चित्रपटाची स्टारकास्ट

दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. 'RRR' ही तेलगू स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित एक काल्पनिक कथा आहे. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण व्यतिरिक्त, 'आरआरआर' मध्ये आलिया भट्ट, अजय देवगण, समुथिरकानी, रे स्टीव्हन्सन, ऑलिव्हिया मॉरिस आणि अॅलिसन डूडी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा - कॅटरिना कैफने 2021 ला बाय बाय म्हणत शेअर केला शेवटचा वर्कआउट व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.