मुंबई - अभिनेत्री अमिषा पटेलचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याच्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. सायबर विभाग पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर अभिनेत्री अमिषा पटेल हिचे हॅक करण्यात आलेले इन्स्टाग्राम अकाउंट रिकव्हर करण्यात आलेल आहे.
४ जानेवारी रोजी अमिषा पटेल हिने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती ज्यात तिने म्हटले होत की , तिचा इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आले असून तिला तिच्या सोशल माध्यमांवर थेट मेसेज येत आहेत. या बरोबरच इन्स्टाग्राम कॉपीराईटचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमिषा पटेलला इंस्टाग्राम कडून अकाउंट बंद करण्याचा इशाराही देण्यात आलेला होता.

युआरएल नेदरलँडमधला तर आयपी अॅड्रेस तुर्की मधला
सायबर पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांच्या लक्षात आले की, सदरचे हे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आले असून त्यावरील बराचसा मजकूर हा डिलीट करण्यात आलेला होता. यासाठी वापरण्यात आलेल्या युआरएल नेदरलँडमधलं होतं , तर आयपी अॅड्रेस हा तुर्कीमधला आढळून आलेला आहे. यानंतर इंस्टाग्रामच्या नोडल ऑफिसरला सायबर पोलिसांकडून संपर्क साधून यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. त्यानंतर अमिषा पटेल हिच हॅक करण्यात आलेला इंस्टाग्राम अकाउंट पूर्णपणे रिकव्हर करण्यात आलेले असून त्या अगोदर डिलीट केलेला मजकूरही पुन्हा मिळविण्यात सायबर पोलिसांना यश आलेला आहे.
हेही वाचा - सर्वसामान्यापर्यंत लस पोहोचण्यास लागतील किमान सहा महिने'