ETV Bharat / sitara

Bal Shivaji: ‘बाल शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन करणार रवी जाधव - Bal Shivaji Motion Poster

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणावर आधारित ऐतिहासिक चित्रपटाचे काम सुरू झाले आहे, अशी घोषणा निर्मात्यांनी शनिवारी शिवजयंतीनिमित्त केली. “बाल शिवाजी” असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाला इरॉस इंटरनॅशनल, आनंद पंडित मोशन पिक्चर्स, रवी जाधव फिल्म्स आणि लिजेंड स्टुडिओज यांचा पाठिंबा असेल.

बाल शिवाजी
बाल शिवाजी
author img

By

Published : Feb 19, 2022, 1:17 PM IST

Updated : Feb 19, 2022, 6:27 PM IST

मुंबई - मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणावर आधारित ऐतिहासिक चित्रपटाचे काम सुरू झाले आहे, अशी घोषणा निर्मात्यांनी शनिवारी शिवजयंतीनिमित्त केली. “बाल शिवाजी” असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाला इरॉस इंटरनॅशनल, आनंद पंडित मोशन पिक्चर्स, रवी जाधव फिल्म्स आणि लिजेंड स्टुडिओज यांचा पाठिंबा असेल.

छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या शौर्यासाठी, लष्करी प्रतिभा आणि नेतृत्वासाठी ओळखले जाते.

निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ते १६ या वयादरम्यान त्यांनी स्वराज्याचा पाया रचला त्या विषयाला केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात येणार आहे.

बाल शिवाजी चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी हे पोस्टर आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.

"बालगंधर्व" आणि "नटरंग" या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले चित्रपट निर्माते रवी जाधव हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

आनंद पंडित मोशन पिक्चर्सचे आनंद पंडित यांनी शेअर केले की त्यांना शिवाजी महाराजांच्या ज्ञात नसलेल्या पैलूंबाबत खोलवर जायचे आहे.

हेही वाचा - Shivaji Maharaj Jayanti 2022 : किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा; शिवभक्तांची गर्दी

Last Updated : Feb 19, 2022, 6:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.