मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याने साकारलेला 'सिम्बा' (2018) आता अॅनिमेशनमध्ये येण्यासाठी सज्ज झाला आहे. याची पुष्टी चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी मंगळवारी केली.
शेट्टी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर 'स्मॅशिंग सिंबा' या अॅनिमेटेड स्पिन ऑफ शोचा टीझर शेअर केला आहे. यावर्षी दिवाळीला किड्स चॅनलवर हा शो रिलीज होईल.
रिलायन्स एन्टरटेनमेंटने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, 'स्मॅशिंग सिम्बा गर्जना करत आहे. माईंड इज ब्लोईंग! असा दमदार पोलीस अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या किशोरवयीन मुलाच्या कारनाम्यांमध्ये सामील व्हा.'
'सिम्बा' चित्रपटात रणवीर कपूर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसला असून यामध्ये अभिनेत्री सारा अली खानही मुख्य भूमिकेत आहे.
हेही वाचा - पूजा हेगडेच्या वाढदिवसानिमित्त प्रभासकडून खास भेट, ‘राधेश्याम’मधील फर्स्ट लूक रिलीज