मुंबई - रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या भूमिका असलेला स्पोर्ट्स ड्रामा 83 चित्रपट या आठवड्यात थिएटरमध्ये रिलीज होत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, मुंबईत चित्रपटाचे स्क्रिनिंग ( 83 Screening ) झाले आणि यावेळी बॉलिवूड सेलिब्रिटींनी ग्लॅमरस शैलीत थिएटरमध्ये प्रवेश केला. इतकेच नाही तर रणवीर-दीपिकाचे ( Ranveer Singh and Deepika Padukone ) कुटुंबीयही चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचले.
![83 प्रीमियरला रणवीरसह दिग्गज कलाकार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13986473_1.jpg)
कोरोना व्हायरसमुळे 83 हा चित्रपट गेल्या दोन वर्षांपासून थिएटरमध्ये रिलीज होण्याच्या प्रतीक्षेत होता. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी झाली आहे. या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी रणवीर आणि चित्रपटातील सर्व कलाकार खूप उत्साहित दिसत होते.
![83 प्रीमियरला रणवीरसह दिग्गज कलाकार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13986473_8.jpg)
यावेळी देशाला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव पत्नी रोमीसोबत चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचले.
![83 प्रीमियरला रणवीरसह दिग्गज कलाकार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13986473_4.jpg)
या चित्रपटात दीपिकाने कपिल देव यांच्या पत्नी रोमीची भूमिका साकारली आहे. स्क्रिनिंगमध्ये सर्वांच्या नजरा दीपिका पदुकोणच्या गॉर्जियस लूकवर खिळल्या होत्या.
![83 प्रीमियरला रणवीरसह दिग्गज कलाकार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13986473_2.jpg)
यावेळी रणवीर सिंगच्या गली बॉयची को-स्टार आलिया भट्टही ग्लॅम स्टाईलमध्ये पोहोचली. आलिया आणि रणवीरचा पुढचा चित्रपट म्हणजे रॉकी और रानी की प्रेम कहानी हा आहे.
![83 प्रीमियरला रणवीरसह दिग्गज कलाकार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13986473_9.jpg)
83 चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या चेहऱ्यावर आनंदाला थारा नव्हता.
![83 प्रीमियरला रणवीरसह दिग्गज कलाकार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13986473_5.jpg)
चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान आपल्या कुटुंबासोबत दिसले.
![83 प्रीमियरला रणवीरसह दिग्गज कलाकार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13986473_3.jpg)
अभिनेता आयुष्मान खुराना आणि अंगद बेदी पत्नी नेहा धुपियासोबत 83 चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी आले होते.
![83 प्रीमियरला रणवीरसह दिग्गज कलाकार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13986473_10.jpg)
यावेळी अभिनेत्री नोरा फतेहीनेही आपल्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घातली.
![83 प्रीमियरला रणवीरसह दिग्गज कलाकार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13986473_72-1.jpg)
![83 प्रीमियरला रणवीरसह दिग्गज कलाकार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13986473_72-2.jpg)
चित्रपट करण जोहर या कार्यक्रमाला हजर राहणार हे तर होणारच होते.
![83 प्रीमियरला रणवीरसह दिग्गज कलाकार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13986473_6.jpg)
अभिनेत्री जान्हवी कपूरनेही चित्रपट 83 च्या स्क्रिनिंगमध्ये काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये सर्वांचे लक्ष वेधले.
83 चित्रपटाच्या स्क्रिनिंगला दीपिका पदुकोणचे संपूर्ण कुटुंबही दिसले होते. दीपिका पदुकोणनेही आई-वडील आणि बहिणीसोबत फोटोंना पोज दिली.
हेही वाचा - 83 Premiere : दीपिका पदुकोणच्या सुंदर लूकने सर्वांचे लक्ष वेधले