मुंबई - अभिनेत्री राधिका मदनने 'सना'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. बुधवारी राधिकाने इंस्टाग्रामवर हे अपडेट तिच्या फॅन्स आणि फॉलोअर्ससोबत शेअर केले. "लेडीज अँड जंटलमन, ये खास उन लोगों के लिए हैं जिनका महिला दिन कभी खतम नहीं होता! आता 'सना'चे शुटिंग करत आहे," तिने लिहिले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तिने एक क्लिप देखील पोस्ट केली आहे ज्यामध्ये प्रेक्षक महिला केंद्रित चित्रपटाबद्दल भरपूर कमेंट्स करीत आहेत. सना या आगामी चित्रपटाची कथा एका महत्त्वकांक्षी मुलीची गोष्ट आहे. हा चित्रपट स्त्री केंद्रीत असून एका सबळ महिलेची गोष्ट यात पाहायला मिळणार आहे. फोर लाइन एंटरटेनमेंट निर्मित, सुधांशू सारिया दिग्दर्शित आणि लिखित 'सना' चित्रपटामध्ये शिखा तलसानिया आणि सोहम शाह देखील आहेत.
या प्रकल्पाविषयी बोलताना सुधांशू म्हणाला, "मौन हे इतके शक्तिशाली साधन असू शकते आणि आमचा सना चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यासाठी यापेक्षा चांगल्या मार्गाचा मी विचार करू शकत नाही. आम्ही जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा केली, तेव्हापासून मला या चित्रपटाच्या थीमबद्दल आणि कलाकारांबद्दल विचारत आहेत. पण याचे उत्तर आता चित्रपट स्वतःच देईल. आम्ही इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञांसह एक उत्कृष्ट कलाकार मिळवण्यात यशस्वी झालो आहोत -- आम्ही एकत्र काय साध्य करतो ते शेअर करण्यासाठी मी जास्त काळ प्रतीक्षा करु शकत नाही."
हेही वाचा - निळ्या पँट सूटमध्ये सोनम कपूरचा प्रेग्नन्सी ग्लो पाहा फोटो