ETV Bharat / sitara

अमेरिकेत प्रियांका चोप्राच्या हॉटेलात वडा-पाव मिळतो 1 हजार रुपयांना

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या अमेरिकेतील सोना या रेस्टॉरंटमध्ये वडा-पाव 1 हजार रुपयांना मिळतो. अभिनयाच्या क्षेत्रात स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण केल्यानंतर तिने रेस्टॉरंटच्या इंडस्ट्रीमध्ये देखील प्रवेश केला आहे.

Priyanka
प्रियांका
author img

By

Published : Aug 8, 2021, 2:14 PM IST

मुंबई - बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये भारतीय रेस्टॉरंट सुरु केलं. तिच्या या रेस्टॉरंटचे नाव ‘सोना’ आहे. या रेस्टॉरंटमध्ये भारतीय पदार्थ पाणीपुरी, डोसा, कुल्चा आणि वडापाव मिळतो. इथे वडा-पाव साधारणतः एक हजार रुपयाला मिळतो. तसेच समोसा, पाणी पुरी, आलू टिक्की, कॉर्न-भेळ ई. पदार्थ सुद्धा याच किंमतीला मिळतात.

Priyanka Chopra's restaurant Sona in New York sells Mumbai's iconic vada pav
प्रियंका चोप्राचं अमेरिकेतील सोना रेस्टॉरंट

महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीमध्ये वडा पाव लीलया सामावला गेला. खरंतर सुरवातीला वडा पाव, भाजी पाव या डिशेस कमी मिळकतीच्या लोकांची भूक भागविण्यासाठीच्या होत्या. अंगमेहनतीची काम करणारे, मिल कामगार, शिपाई कर्मचारी ई. लोकांचे ते भोजन होते किंवा अजूनही आहे. याचे कारण म्हणजे, अत्यल्प दरात पोट भरणाऱ्या या डिशेस आहेत. परंतु या डिशेस उच्चभ्रू लोकांनाही आवडू लागल्या आणि त्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि फाईव्ह-स्टार हॉटेलांमध्ये सुद्धा मिळू लागल्या. इतकंच काय तर त्यांची कीर्ति सातासमुद्रापार पोहोचली आणि आता जगातील जवळपास प्रत्येक मोठ्या शहरात वडा-पाव उपलब्ध आहे.

प्रियंकाच्या रेस्टॉरंटमध्ये अस्सल भारतीय पदार्थ मिळतात.

मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी प्रियांका चोप्रा ही ‘ब्युटी विथ ब्रेन’ म्हणून ओळखली जाते. जागतिक सौंदर्यवतीचा किताब पटकावल्यावर तिने सिनेसृष्टीत प्रवेश केला. सुरुवातीला नकारात्मक भूमिका करत ती बॉलिवूडची मोठी हिरॉईन बनली. आता प्रियांका हॉलिवूड सुद्धा गाजवत आहे. तसेच प्रियंकाने निक जोनस या अमेरिकन गायकासोबत लग्नगाठ बांधली.

डेविड रॉबिन आणि मनीष गोयल सोबत प्रियांका चोप्रा ‘सोना’ हे रेस्टॉरंट चालवत आहे.

प्रियंकाने आपल्या नवऱ्यासोबत न्यूयॉर्कमध्ये एक रेस्टॉरंट उघडलं आहे आणि त्याची खासियत म्हणजे तिथे अस्सल भारतीय पदार्थ मिळतात. डेविड रॉबिन आणि मनीष गोयल सोबत प्रियांका चोप्रा ‘सोना’ हे रेस्टॉरंट चालवत आहे. प्रियांका चोप्राच्या न्यूयॉर्क येथील मॅनहॅटन या उच्चभ्रू वस्तीत वसलेल्या रेस्टॉरंटचे नाव ‘सोना’ आहे. या रेस्टॉरंटचा शेफ हरी नायक आहे. त्यांना जगातील अनेक प्रमुख शहरातील हॉटेल्सचा अनुभव आहे आणि त्याने परिश्रम घेऊन ‘मेन्यू’ सेट केलाय, ज्यात प्रियांकानेही खूप मदत केलीय. मुंबईतील स्ट्रीट-फूड म्हणजे आपल्या खाऊ-गल्लीत मिळणारे चटपटीत पदार्थ, वडा-पाव, सामोसा, चाट ई. यांचादेखील समावेश ‘सोना’ च्या मेन्यूत आहे.

प्रियंका पक्की ‘देसी-गर्ल’ असल्यामुळे तिची फेवरेट डिश बटर चिकन सुद्धा येथे मिळते. ‘सोना’ मध्ये ‘टकीला पाणी पुरी’ मिळते. टकीला हे मेक्सिकन दारू-पेय आहे. प्रियांका चोप्रा मुंबईत अनेक वर्षे राहिल्यामुळे महाराष्ट्रीयन लोकांचा आवडता गोड पदार्थ श्रीखंड सुद्धा ‘सोना’ च्या मेन्यूत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.