मुंबई - अभिनेता प्रभास नव्या चित्रपटासाठी सज्ज झालाय. बाहुबली आणि साहो चित्रपटामुळे देशभर चाहते अलेल्या प्रभासने स्वतःच याची घोषणा केली. सोशल मीडियावर फर्स्ट लूक शेअर करीत चाहत्यांना त्याने खूश केले आहे.
या फोटोत तो एका आलिशान पॅलेस किंवा म्यूझियममध्ये दिसत आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ''हे सांगताना मला आनंद होतोय की मी नव्या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करीत आहे. चित्रपटाच्या मजेदार शेड्यूलकडे जात आहे.''
- View this post on Instagram
Elated to share that I’m resuming shooting for my upcoming film. Looking forward to a fun schedule.
">
प्रभासचे चाहते या बातमीमुळे खूश झाले आहेत. दक्षिणेत त्याच्या चाहत्यांचे फॅन क्लब आहेत. सोशल मीडियावर ते आपला आनंद व्यक्त करीत आहेत. त्याच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण करीत आहेत. तेलुगुत बनत असलेला हा चित्रपट अनेक भाषांमधून रिलीज केला जाणार आहे. चित्रपटाचे शीर्षक अद्याप गुलदस्त्यात आहे.