मुंबई - सुपरस्टार प्रभासच्या आगामी ‘राधे-श्याम’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरने चाहत्यांचा उत्साहही वाढला आहे. पोस्टरमधील प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा अंदाज अप्रतिम दिसत आहे. प्रभासने राधेश्यामचे मोशन पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले असून आतापर्यंत १२ लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. विशेष म्हणजे प्रभासने त्याच्या ४१ व्या वाढदिवशी या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. चाहतेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
प्रभासच्या आगामी राधे-श्याम चित्रपटाच्या या मोशन पोस्टरमध्ये ट्रेन हिरव्यागार खोऱ्यातून जात असल्याचे दिसत आहे. या ट्रेनमध्ये अभिनेत्री पूजा हेगडे दऱ्यांचा आनंद घेत गेटवर उभी असताना दिसली आहे, तर अभिनेता प्रभास तिच्यासोबत दिसला आहे. व्हिडिओमध्ये या दोघांची स्टाईल आणि केमिस्ट्री जबरदस्त दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हे मोशन पोस्टर प्रसिद्ध करताना प्रभासने लिहिले की, "आपणा सर्वांचे या रोमँटिक प्रवासामध्ये स्वागत आहे." प्रभासने यापूर्वी पूजा हेगडे हिच्या वाढदिवशी राधे श्यामशी संबंधित एक फोटो शेअर केला होता, त्यामध्ये त्याने पूजा हेगडेचा फर्स्ट लूकही शेअर केला होता. पूजा हेगडे या चित्रपटात प्रेरणाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाशिवाय प्रभास लवकरच 'आदिपुरुष'मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात प्रभास जर रामची भूमिका साकारत असेल तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसू शकेल.