ETV Bharat / sitara

अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या सेटवरील वाहनांवर पोलिसांची कारवाई - Police action on shooting vehicles

काल रात्री मुंबईतील दाना पानी येथे अक्षय कुमारच्या एका चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. शूटिंगदरम्यान व्हॅनिटी व्हॅन आणि इतर वाहने विनापरवाना रस्त्यावर उभी करण्यात आली होती. या तक्रारीनंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी त्या सर्व वाहनांना टाळे ठोकले.

अक्षय कुमार ट्विटरवरील फोटो
अक्षय कुमार ट्विटरवरील फोटो
author img

By

Published : Feb 24, 2022, 1:06 PM IST

मुंबई - काल रात्री मुंबईतील दाना पानी येथे अक्षय कुमारच्या एका चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. शूटिंगदरम्यान व्हॅनिटी व्हॅन आणि इतर वाहने विनापरवाना रस्त्यावर उभी करण्यात आली होती. या तक्रारीनंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी त्या सर्व वाहनांना टाळे ठोकले.

अवैध पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई

रात्री उशिरा वाहतूक पोलिसांनी शूटिंगसाठी आलेल्या वाहनांवर कारवाई केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारवाईच्या वेळी अक्षय कुमार तिथे नव्हता, त्यापूर्वी तो शूटिंगनंतर निघून गेला होता.

याबाबत वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेटबाहेरील रस्त्यावर उभी केलेली वाहने आधी हटवण्यास सांगितले होते. त्यानंतरही ही वाहने हटवली नाहीत. त्यामुळे बेकायदा पार्क केलेल्या 20 वाहनांवर दुहेरी कारवाई करण्यात आली आहे.

अवैध पार्किंगची तक्रार ट्विट करून करण्यात आली होती, त्यानंतर वाहतूक पोलिस आणि मालवणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

हेही वाचा - 'द ग्रेट इंडियन किचन'च्या हिंदी रिमेकमध्ये सान्या मल्होत्रा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.