पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिलीज होतोय. १२ एप्रिलला रिजीज करण्याचा निर्णय झाला होता. मात्र हा सिनेमा एक आठवडा अगोदरच म्हणजे ५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस आणला जात आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक ओमंग कुमार या सिनेमाचे दिग्दर्शन करीत आहेत.
निर्माता संदिप सिंग म्हणाले, ''लोकांच्या आग्रहास्तव हा सिनेमा आम्ही एक आठवडा अगोदर रिलीज करीत आहोत. लोकांचे प्रचंड प्रेम असून ते सिनेमासाठी आतुर झाले आहेत. ही कथा १३० कोटी लोकांची आहे आणि आम्हाला त्यांना दाखवण्यासाठी विलंब करायचा नाही.''
निर्मात्यांचे असे जरी म्हणणे असले तरी आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रिलीज प्रिपोंडचा निर्णय झालाय हे उघड आहे. या सिनेमामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकतील असा विश्वास निर्मात्यांना वाटतो आहे.
या चित्रपटात विवेक ओबेरॉय याने मुख्य भूमिका साकारली आहे. बोमन इराणी, राजेंद्र गुप्ता, यतीन कार्येकर, प्रशांत नारायण, झरीना वहाब आणि मनोज जोशी यांच्या यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.