ETV Bharat / sitara

पठाण : शाहरुख, दीपिका स्पेनमध्ये प्रेक्षणीय स्थळावर करणार गाण्याचे शुटिंग - बॉलिवूड स्टार शाहरुख खान

बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण त्यांच्या आगामी पठाण चित्रपटाच्या शुटिंगसाठी स्पेनला रवाना होत आहेत. या देशातील पूर्वी कधीही पडद्यावर न दिसलेल्या प्रेेक्षणीय स्थळावर ते शूट करतील.

शाहरुख, दीपिका
शाहरुख, दीपिका
author img

By

Published : Sep 28, 2021, 7:05 PM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण त्यांच्या आगामी पठाण चित्रपटाच्या एका गाण्याच्या शुटिंगसाठी मल्लोर्काला जात आहेत. 7 ऑक्टोबर रोजी टीम स्पेनला रवाना होईल, असे अहवाल म्हटले आहे. "पठाण चित्रपट दृष्याच्या पातळीवर नेत्रदिपक बनवण्याचा टीमचा हेतू आहे. यापूर्वी कोणीही पाहिले नाही अशी दृष्ये यासाठी चित्रीत करण्याची महत्त्वकांक्षा सिद्धार्थ आनंद (दिग्दर्शक) आणि YRF बाळगून आहेत. यासाठी कोणताही कसूर सोडायचा नाही असे त्यांनी ठरवले आहे.

"पठाण चित्रपटाची टीम स्पेनला रवाना होईल. येथे ते मल्लोर्का, कॅडिज आणि वेजर दे ला फ्रोंटेरा सारख्या भव्य ठिकाणी शूटिंग करणार आहेत. 10 ते 31 ऑक्टोबर दरम्यान टीम स्पेनमध्ये असेल", असे सूत्राने सांगितले.

"या ठिकाणी इतर कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाचे चित्रीकरण झालेले नाही, त्यामुळे प्रेक्षक, ही प्रेक्षणीय, खर्चिक आणि मोहक ठिकाणे प्रथमच पाहतील. या चित्रपटातील हे सीन्स भव्य आणि आकर्षक ठरतील.," असेही सूत्राने सांगितले.

पठाण चित्रपटामध्ये जॉन अब्राहमचीही महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटाबद्दलचा इतर तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा - Hbd रणबीर कपूर: वैविध्यपूर्ण भूमिका साकारणार चतुरस्त्र अभिनेता

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.