मुंबई - बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम काही महिन्यांपूर्वीच 'सत्यमेव जयते' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, या चित्रपटाच्या अपयशानंतरही त्याने 'बाटला हाऊस' चित्रपट साईन केला. यानंतर आता तो आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'पागलपंती' असं शीर्षक असलेल्या या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती. यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली होती. परंतु, आता या तारखेत बदल करण्यात आला असून आता हा चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
यात जॉनशिवाय इलियाना डिक्रुझ, अनिल कपूर, अर्शद वारसी, उर्वशी रौतेला, सौरभ शुक्ला, क्रिती खारबंदा आणि पुलकीत सम्राट या कलाकारांच्याही महत्तावाच्या भूमिका असणार आहेत. तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बझमी करणार आहेत.