ETV Bharat / sitara

दोन मनं, ज्यांनी लाखोंच्या हृदयावर केलं राज्य; जान्हवी-ईशानच्या 'धडक'ची वर्षपूर्ती

author img

By

Published : Jul 20, 2019, 4:20 PM IST

'दोन हृदय एक ठोका, ज्यांनी अनेक मनांवर राज्य केलं. खरं निरागस प्रेम काय असतं हे या चित्रपटातून दिसतं', अशी पोस्ट शेअर करत चित्रपट निर्माता करण जोहरने चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे. यासोबतच चित्रपटातील एक व्हिडिओही शेअर केला आहे.

जान्हवी-ईशानच्या 'धडक'ची वर्षपूर्ती

मुंबई - दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरनंही याच चित्रपटातून बॉलिवूडमधील करिअरला सुरूवात केली. या कलाकारांच्या पदार्पणाला आणि 'धडक' चित्रपटाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे.

'दोन हृदय एक ठोका, ज्यांनी अनेक मनांवर राज्य केलं. खरं निरागस प्रेम काय असतं हे या चित्रपटातून दिसतं', अशी पोस्ट शेअर करत चित्रपट निर्माता करण जोहरने चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे. यासोबतच चित्रपटातील एक व्हिडिओही शेअर केला आहे.

It's one year already!! Two hearts, one heartbeat - that touched the hearts of many. This is what pure innocent love looks like, congrats to the entire team!❤ #1YearOfDhadak #Janhvi #Ishaan @ShashankKhaitan @apoorvamehta18 @DharmaMovies @ZeeStudios_ @ZeeMusicCompany pic.twitter.com/0ZqG7HZe1N

— Karan Johar (@karanjohar) July 20, 2019 ">

मराठीतील 'सैराट' या चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या 'धडक' चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. ईशान आणि जान्हवीच्या जोडीने आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. शशांक खेतान यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दरम्यान यानंतर जान्हवीने अनेक चित्रपट साईन केले असून ती सध्या आपल्या 'कारगिल गर्ल' आणि 'रूही अफ्झा' चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

मुंबई - दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरनंही याच चित्रपटातून बॉलिवूडमधील करिअरला सुरूवात केली. या कलाकारांच्या पदार्पणाला आणि 'धडक' चित्रपटाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे.

'दोन हृदय एक ठोका, ज्यांनी अनेक मनांवर राज्य केलं. खरं निरागस प्रेम काय असतं हे या चित्रपटातून दिसतं', अशी पोस्ट शेअर करत चित्रपट निर्माता करण जोहरने चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे. यासोबतच चित्रपटातील एक व्हिडिओही शेअर केला आहे.

मराठीतील 'सैराट' या चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या 'धडक' चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. ईशान आणि जान्हवीच्या जोडीने आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. शशांक खेतान यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दरम्यान यानंतर जान्हवीने अनेक चित्रपट साईन केले असून ती सध्या आपल्या 'कारगिल गर्ल' आणि 'रूही अफ्झा' चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.