मुंबई - प्यार का पंचनामा आणि सोनू के टीटू की स्वीटीसारख्या रोमँटिक विनोदी लोकप्रिय झालेली अभिनेत्री नुसरत भरुचाने आपल्या कामाचा वेग वाढवला आहे. ती आता 'छोरी' या चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटातील एक इमोशनल सीन करीत असताना ती भूमिकेत इतकी शिरली होती की ती सेटवरही अश्रू ढाळताना दिसली.
विशाल फुरिया दिग्दर्शित, छोरी हा सामाजिक संदेश देणारा एक भयचित्रपट आहे. गेल्या महिन्यात नुसरतने मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील पिपरिया गावात शूटिंगला सुरुवात केली. ही टीम संपूर्ण डिसेंबरमध्ये राज्यभरात शुटिंग करणार आहे. त्यानंतर शेवटच्या सत्रातील शुटिंग मुंबईत पार पडेल.
मराठी चित्रपट 'लपाछपी'चा 'छोरी' आहे रिमेक
छोरी हा विशाल फुरियाच्या २०१७ मधील हिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटातील आघाडीची महिला म्हणून काम करणारी नुसरत इमोशनली चार्ज सीनसाठी शूट करत होती. अभिनेत्री या सीक्वेन्समुळे इतकी गढून गेली होती की सेटवरही अश्रू ढाळताना दिसली.
हेही वाचा - नुसरत भरूचा ऊसात करतेय 'छोरी'चे शूटिंग
शूटिंगच्या अनुभवाबद्दल बोलताना नुसरत म्हणाली, “काल मी एका गहन सीनच्या शूटिंगच्या वेळी सेटवरच अश्रू अनावर झाले. दिग्दर्शक जेव्हा कट बोलले तेव्हा मला आश्चर्य वाटले आणि ते मला सावरण्यासाठी धावत आले. मला माहित नाही की हे गेल्या कित्येक महिन्यांचा थकव्यामुळे आहे की फक्त माझ्या भावनांमुळे (माझ्याकडून बरे होत आहेत), पण मी रडणे थांबवू शकले नाही. "
छोरी व्यतिरिक्त, नुसरत भरुचा आगामी 'हूरदंग' आणि ओमंग कुमार यांच्या 'जनहित में जारी'मध्येही दिसणार आहेत.
हेही वाचा -हॉट गुलाबी बिकनीमध्ये दिसली नुसरत भरुचा