मुंबई - अभिनेत्री फातिमा सना शेख कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. याबाबत तिने स्वतः सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. तिने स्वतःला घरीच अलगीकरणात ठेवले असल्याचेही सांगितले आहे. ती कोरोनाबाबत असलेल्या सर्व नियमांचे पालन करणार असल्याचेही तिने इंस्टाग्रामवर पोस्ट करत सांगितले आहे.
'माझा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करत असून मी घरीच क्वारंटाइनमध्ये आहे. कृपया तुम्हीही सुरक्षित रहा', अशी पोस्ट तिने इंस्टाग्रामवर केली आहे.
बॉलिवूडमधील अनेकांना कोरोनाची लागण
महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून बॉलिवूडमधील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, संजय लीला भन्साळी, परेश रावल, सिद्धांत चतुर्वेदी व कार्तिक आर्यन यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या या सर्वांनी स्वतःला क्वारंटाइनमध्ये ठेवले आहे.
हेही वाचा - परेश रावल यांना कोरोनाची बाधा, काही दिवसापूर्वीच घेतली होती लस