ETV Bharat / sitara

'नाच मेरी रानी' गाण्यावर नोरा फतेहीचा आवेज दरबारसोबत जलवा - Nora Fateh with Awez Darbar

अभिनेत्री नोरा फतेही तिच्या 'नाच मेरी रानी' या गाण्याचे जोरदार प्रमोशन करीत आहे. अलिकडेच तिचा एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ती आवेज दरबारसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

Nora Fateh with Awez Darbar
आवेज दरबारसोबत नोरा फतेही
author img

By

Published : Oct 27, 2020, 5:31 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही अलिकडे तिच्या सोशल मीडियावरील डान्समुळे खूप चर्चेत आहे. अलिकडेच तिचे 'नाच मेरी रानी' हे गाणे रिलीज झाले होते. या गाण्याने धमाल उडवून दिली आहे. नोरा फतेही या गाण्याचे जोरदार प्रमोशन करीत आहे. अलिकडेच तिचा एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ती आवेज दरबारसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. यात आवेजसोबत दमदार स्टेप्स करीत नोराने आपला जलवा दाखवून दिलाय.

व्हिडिओमध्ये नोरा फतेही ब्राऊन कलरच्या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. नोरा आणि आवेजचा व्हिडिओ 'मुंबई डान्सर्स'ने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओला चाहत्यांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. भरपूर प्रतिक्रियाही मिळत आहेत.

नोरा फतेही आणि गुरु रंधावा पहिल्यांदाच 'नाच मेरी राणी' या गाण्यातून एकत्र आले आहेत. या गाण्याला आतापर्यंत ३५ दशलक्ष वेळा पाहिले गेले आहे.

कामाच्या बाबतीत विचार केला तर नोरा फतेही आगामी 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातही ती आपल्या गाण्यातून धमाल उडवणार असल्याचे समजते. याशिवाय ती 'दिलबर', 'कमरिया', 'साकी-साकी' आणि 'एक तो काम जिंदगानी' या गाण्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.