मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीने 6 फेब्रुवारी रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्री दुबईत असली तरी तिच्या चाहत्यांनी भारतातील 300 वंचित मुलांना खायला घातले. आज सकाळी दुबईहून परतलेल्या नोरा फतेहीने याबद्दल तिच्या चाहत्यांचे आभार सोशल मीडिया हँडलवर मानले आहेत.
नोरा फतेहीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, तिचे सहा फॅन क्लब फूड ड्राईव्हसह वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. अभिनेत्रीचा वाढदिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी 300 वंचित मुलांना खाऊ दिला. यासाठी नोराच्या फॅन्स क्लबने थागम फाउंडेशन या एनजीओशी संपर्क साधला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तिच्या चाहत्यांचे प्रयत्न आणि प्रेम ओळखून नोराने सोशल मीडियावर व्हिडिओ पुन्हा पोस्ट केला. व्हिडिओसोबत तिने लिहिले, "मी आत्ता अक्षरशः रडत आहे. ही आजवरची सर्वोत्तम भेट आहे! माझ्या सर्व फॅन क्लब्सना धन्यवाद जे एकत्र आले आणि माझ्या नावाने अनेक वंचित मुलांना खायला दिले. माझे चाहते खूप उदार विचारांचे आणि चांगल्या मनाच्या आहेत. ! या अप्रतिम अनमोल भेटवस्तूबद्दल तुमचे खूप खूप आभार, देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो."
हेही वाचा - गंगुबाई काठियावाडी प्रमोशन: आलिया भट्टचा पांढऱ्या साडीतील रेट्रो चार्म