भुज - द प्राईड ऑफ इंडिया या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा दुसरा ट्रेलर लॉन्च झाला आहे. सत्य कथेवर आधारित या चित्रपटामध्ये सैनिक आणि गावकऱ्यांनी दाखवलेले असामान्य साहस आणि शत्रूवर केलेला प्रहार या ट्रेलरमध्ये दिसतो. सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवणारा हा ट्रेलर आहे.
या ट्रेलरमध्ये अजय देवगणच्या तोंडी आणखी एक दीर्घ डायलॉग लक्ष वेधणारा आहे. दुश्मानांचा सामना करणारे प्रभारी आयएएफ स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिक म्हणतात, ''तू हमारे औकात का अंदाजा क्या लगायेगा, हम उस महान छत्रपती शिवाजी महाराज की औलाद है जिन्होने मुघलों को घुटने पे ला दिया था. और अपने खून से हिंदुस्थान का इतिहास लिखा था.''
-
In the face of insurmountable odds, our heroes led us to victory.
— Ajay Devgn (@ajaydevgn) August 3, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Witness the rise of our unsung heroes in #BhujThePrideOfIndia, releasing on 13th August only on @DisneyplusHSVIP #DisneyPlusHotstarMultiplex https://t.co/5YnmgbJGQG@duttsanjay #SonakshiSinha
">In the face of insurmountable odds, our heroes led us to victory.
— Ajay Devgn (@ajaydevgn) August 3, 2021
Witness the rise of our unsung heroes in #BhujThePrideOfIndia, releasing on 13th August only on @DisneyplusHSVIP #DisneyPlusHotstarMultiplex https://t.co/5YnmgbJGQG@duttsanjay #SonakshiSinhaIn the face of insurmountable odds, our heroes led us to victory.
— Ajay Devgn (@ajaydevgn) August 3, 2021
Witness the rise of our unsung heroes in #BhujThePrideOfIndia, releasing on 13th August only on @DisneyplusHSVIP #DisneyPlusHotstarMultiplex https://t.co/5YnmgbJGQG@duttsanjay #SonakshiSinha
या चित्रपटाच्या पहिल्या भागातील संवादही असेच गाजलेले होते. यातील लक्ष वेधणारे काही डायॉग्ज पुढील प्रमाणे -
''मराठा सिर्फ दो ही बात जानता है...मारना या मरना''
''किसी की जान बचाने के लिए की गई हिंसा धर्म है, ताजमहल प्यार की निशानी है तो हिंदुस्तान तेरे बाप की कहानी है''
''या खुदा तेरी अदालत में मेरी एक जमानत रखना, मैं रहूं या ना रहूं मेरे हिंदुस्तान को सलामत रखना''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
काय आहे चित्रपटाची कथा?
'उरी' चित्रपटाला मिळालेल्या उत्तम यशानंतर आता आणखी एक युध्दपट येत आहे 'भूज द प्राईड ऑफ इंडिया'. अभिषेक दुधाइया 'भूज द प्राईड ऑफ इंडिया' या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यात १९७१ च्या भारत पाक युध्दाची कथा पडद्यावर साकारली जाणार आहे. या चित्रपटाची कहाणी भुज विमानतळाचा प्रभारी आयएएफ स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिक यांच्याभोवती फिरत आहे.
हा चित्रपट 13 ऑगस्ट रोजी डिस्ने-हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. अजय देवगणशिवाय संजय दत्त, सोनाक्षी, नोरा आणि अॅमी यांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. त्यांच्याशिवाय शरद केळकर, प्रणीता सुभाष, इहाना ढिल्लनसुद्धा स्क्रीन शेअर करताना दिसतील.
हेही वाचा - दिग्दर्शक शशि चंद्रकांत खंदारे यांचा क्लॅप बॉय ते डिरेक्टर या प्रवासातील पहिले पाऊल ‘जिप्सी'!