मुंबई - विद्युत जामवालची मुख्य भूमिका असलेला 'जंगली' चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. शुक्रवारी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशात प्रदर्शनाच्या एक दिवस आधी चित्रपटातील एक नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'दोस्ती' असं या गाण्याचं शीर्षक आहे.
या गाण्यात विद्युत जामवाल आणि हत्तीची घनिष्ठ मैत्री पाहायला मिळते. केवळ २ मिनिटांच्या या गाण्यात विद्युतच्या बालपणापासून तरुणपणापर्यंतचा हत्तीसोबतचा खास प्रवास दाखवण्यात आला आहे. मोहन कन्नन यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. तर कुमार सूर्यवंशी यांचे बोल आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'जंगली' चित्रपटाचं दिग्दर्शन चक रसेल यांनी केलं असून चित्रपटात विद्युतशिवाय पुजा सावंत, आशा भट्ट, अतुल कुलकर्णी, मकरंद देशपांडे आणि अक्षय ओबेरॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. २९ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.